शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रितेश देशमुखने ‘या’ अभिनेत्याला दिलं गोड सरप्राईज, गुढीपाडव्यादिवशी थेट कॉल केला आणि…; म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 20, 2026 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kapil Honrao On Riteish Deshmukh

रितेश देशमुखने 'या' अभिनेत्याला दिलं गोड सरप्राईज, गुढीपाडव्यादिवशी थेट कॉल केला आणि...; म्हणाला...

Kapil Honrao On Riteish Deshmukh : ‘राजा शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखच्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. येत्या १ मे रोजी हा सिनेमा सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टिझर आल्यापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. अभिनेता रितेश देशमुख या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या सिनेमामध्ये मालिकाविश्वातील एक चेहराही पाहायला मिळणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनराव याने सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रितेश देशमुखसह काम करण्याचं कपिल होनरावचं स्वप्न होतं.

काल गुढीपाडव्याच्या दिवशी कपिलला अभिनेता रितेश देशमुखने स्वतःहून समोरून फोन केला. आणि त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा आनंद त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अभिनेत्याने दोन स्क्रीन शॉट पोस्ट केले आहेत. त्यातील एका स्क्रीनशॉटमध्ये लिहिले आहे की, “यापेक्षा बेस्ट गुढीपाडवा होऊ शकतो का? जेव्हा सुपरस्टार दिग्दर्शक तुम्हाला स्वतः फोन करतात. रितेश देशमुख सरांचा स्वतःहून फोन येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा मी एक भाग आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा येत्या १ मे रोजी रिलीज होत आहे”.

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्याने सुरु केला नवा व्यवसाय, पारंपरिक व्यवसायाने जिंकली मन, कलाकारांनीही केलं कौतुक

दुसरी एक स्टोरी शेअर करत त्याने लिहिले की, “मी जवळपास एक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं पण कधीच त्यांचा नंबर मागितला नाही. आपलं काम प्रामाणिक करायच आणि घरी जायचं हे मी इमानदारीने करत आलो. खूप वेळा वाटलं की त्यांचा नंबर मागूया पण कधीच हिम्मत झाली नाही. मग स्वतःला सांगितलं ठीक आहे आपलं काम करत राहायचं आणि आज स्वतः रितेश देशमुख सरांचा फोन आला ते खरंच सुपरस्टार आहेत”.

आणखी वाचा – भारती सिंहचा लेक दिसतो इतका क्युट, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…

‘राजा शिवाजी’ सिनेमा बद्दल बोलायचे झाल्यास हा सिनेमा येत्या १ मे रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश देशमुख सह जेनेलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जितेंद्र जोशी, भाग्यश्री पटवर्धन यांसारख्या तगड्या कलाकारांची झलक दिसत आहे.

Tags: kapil honraomarathi actorriteish deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Hina Khan Eid

हातावर मेहंदी काढणं हिना खानला पडलं महागात, रोजा न ठेवल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, "ईद दोन दिवस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.