महिलेचं अस्तित्व जोपासणारा बाईपण भारी देवा हा चित्रपट समस्त महिला वर्गाच्या मनाचा ठाव घ्यायला कुठेही कमी पडत नाही आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, दीपा परब पाहायला मिळत आहेत. बाईपण भारी देवा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या चित्रपटातील कलाकार मंडळी ही चित्रपट प्रदर्शनानंतरही प्रेक्षकांना भेट देण्यास चित्रपटगृहात जातं आहेत.(Sukanya Mone Vinay Apte)
या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं असून नुकतीच या चित्रपटाच्या टीमने होम मिनिस्टर या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी आदेश बांदेकर यांनी या सगळ्या प्रवासात तुम्ही आता सगळ्यात जास्त कोणाला मिस करताय असा प्रश्न विचारला असता सुकन्या मोने यांनी म्हटलं, विनय आपटे. विनय आपटेला मी खूप मिस करतेय. नाही बोलू शकत पुढे काही. आणि बाबा तर असतातच ना, बाबांना मी मिस करत नाही आहे कारण माझ्या आयुष्यात जरा काही झालं तर ते माझ्या स्वप्नांत येऊन मला जाग करतात, त्यामुळे ते मला सोडून गेलेलेच नाही आहेत. ते आहेतच माझ्या बरोबर. विनयला मी खूप मिस करतेय असं म्हणत सुकन्या मोने यांना देखील भरून आलं.
पाहा सुकन्या मोने यांना का आलं भरून (Sukanya Mone Vinay Apte)
ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे आज आपल्यात नाही आहेत तरी वेळोवेळी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. अभिनयाचं विद्यापीठ असलेल्या विनय आपटे यांनी रंगभूमी, टीव्ही, चित्रपट या तिन्ही विश्वावर राज्य केलं. शिवाय विनय आपटे यांची आणखी एक सांगायची आठवण म्हणजे नव्यानं या क्षेत्रात येणाऱ्या मुलांना अमाप उमेद आणि प्रोत्साहन देण्यात ते तप्तर असतं. मराठी सिनेसृष्टीत, टीव्ही इंडस्ट्रीत अनेक कलाकार आजही आपटेंना गुरुस्थानी मानतात. सिनेविश्वात घोडदौड करणाऱ्या अनेक कलाकारांना आपटे यांनीच धडे दिले आहेत.(Sukanya Mone Vinay Apte)
हे देखील वाचा – भांडायला तू घरी तरी असतोस का-सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची मजेशीर जुगलबंदी
सुकन्या मोने यांनी त्यांच्या प्रवासात विनय आपटे असायला हवे होते अशी इच्छा व्यक्त केली आहे.
