सध्या जो मराठी चित्रपट सगळे चित्रपटगृह हाऊसफुल करतो आहे तो म्हणजे बाई पण भारी देवा.कथा,अभिनय,दिग्दर्शन असा सर्वार्थाने परिपूर्ण असणारा असा हा चित्रपट आहे. चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक कायमच उत्तम प्रतिसाद देतात.म्हणूनच बाई पण भारी देवा या चित्रपटाने पाहिल्यात आठवड्यात उत्तम कमाई केली आहे.भावनांचा उत्तम समतोल,उत्तम अभिनय, उत्तम कथा आणि उत्तम दिग्दर्शन याच ज्वलंत उदाहरण म्हणजे बाई पण भारी देवा हा चित्रपट आहे. (Suchitra Aadesh Bandekar Fight)
कलाकार, दिग्दर्शक,लेखक आणि संपूर्ण टीमच्या कामाचे चीज तेव्हाच होते, जेव्हा आपला चित्रपट आपल्या जास्तीत जास्त प्रेक्षकापर्यंत पोहचतो.आणि बाईपण भारी देवा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मानत एक स्थान निर्माण केलं आहे, परंतु हे सगळं अवलंबुन असत ते चित्रपटाच्या प्रमोशनवर. चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहून बाईपण भारी देवा या चित्रपटाने प्रमोशनच्या बाबतीत बाजी मारल्याचं दिसते आहे.
जाणून घ्या काय आहे किस्सा? (Suchitra Aadesh Bandekar Fight)
मालिका, रिऍलिटी शो, हे प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच असतात, आणि या मार्फत केलेलं प्रमोशन नक्कीच फायद्याचं ठरत. प्रत्येक गृहिणीची अनेक स्वप्न असतात त्यातील एक आदेश भाओजींची पैठणी मिळवणं हे असत.अनेक वर्ष गृहिणींच्या मनावर राज्य करणार शो म्हणजे, होम मिनिस्टर.या शो मुळे अभिनेते आदेश बांदेकर महाराष्ट्राचे लाडके भावोजी झाले.बाईपण भारी देवाच्या टीमने देखील या शो मध्ये हजेरी लावली होती, तेव्हा गप्पांदरम्यान आदेश बांदेकर यांनी नवऱ्यावरचा राग कसा व्यक्त करता असा प्रश्न विचारला होता.

बाईपण भारी देवा चित्रपटामध्ये आदेश बांदेकर यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर देखील मुख्य भूमिकेत आहे, तर आदेश बांदेकर यांच्या प्रश्नावर सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांची मजेशीर जुगलबंदी रंगली. सुचित्रा बांदेकर म्हणाल्या,कुठे येतो हल्ली मला राग, त्यावर आदेश बांदेकर मिश्कीलपणे हसत म्हणाले, नाही ग तीस वर्षात मी पहिलाच नाही तुझा राग.त्यावर अभिनेत्री सुकन्या मोनेंनी आपल्या मैत्रिणीची बाजू घेत आदेश बांदेकरांना उत्तर दिले, तू मुळात असतोस का घरी तिचा राग बघायला, काय करणार बिचारी आमची मैत्रीण.त्यावर आदेश यांनी सांगितलं की सुचित्राचा राग लगेच कळतो, ती तिचा राग लपवून नाही ठेवू शकत,त्यावर अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी देखील आदेश बांदेकर यांच्या बोलण्याला दुजोरा दिला.(Suchitra Aadesh Bandekar Fight)
हे देखील वाचा : बघण्याच्या कार्यक्रमात गाऊन दाखवली बैठकीची लावणी- वंदना गुप्तेंचा मजेशीर किस्सा