प्रत्येक कलाकार त्याचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी जीवतोड मेहनत घेत असतो. तसेच काही सिन तर जीवावर बेतणारे असतात. आणि याचे अनेक bts व्हिडीओ कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचवेळा शेअर करतात. हे व्हिडीओ पाहून कोणतेही कलाकार एखाद्या सीन मध्ये जिवंतपणा आणण्यासाठी किती मेहनत घेतात हे लक्षात येतं.तर नुकतंच अभिनेत्री कुंजिका काळवींट हिने देखील एक Bts व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून सध्या चाहते चकित झालेत.(Kunjika Kalwint)
मराठमोळी अभिनेत्री कुंजिका काळवींट ही मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ही सध्या स्टार प्रवाहावरील शुभविवाह या मालिकेत पौर्णिमा हे पात्र साकारताना दिसते. ही मालिका आणि या मालिकेतील सर्वच पात्र चाहत्यांना खूप आवडतात. यात कुंजिका जरी नकारात्म पात्र साकारत असली तरी तिच्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळते. यासोबतच तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.तर तिने सोशल मीडियावर या मालिकेतील एक सीनचा Bts व्हिडीओ शेअर केला. आणि व्हिडीओ पाहून चाहते चकित झालेत कारण या व्हिडिओत ती ताटभर मिरच्या खाताना दिसून येते.

====
हे देखील नक्की वाचा-“पुन्हा असली कामं करू नकोस रे बाबा!” जेव्हा काम बघून आई नानांना म्हणाल्या…
====
या व्हिडिओत ती या सीनसाठी कोणत्याही अभावी खोट्या मिरच्या खात नसून यात ती खरोखरच्या हिरव्या तिखट मिरच्या खात आहे. आणि मग सिन झाल्यावर ती चॉकलेटवर ताव मारताना दिसून येते. हा व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून मिरची हि तिखट असू अशक्ते पण जेव्हा तुमच्या कामाचा प्रश्न तेव्हा ती तुमचे काम अधिक मसालेदार बनवते. असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला. तर तिच्या या व्हिडीओवर चात्यानी तिच्या कमावणं कौतुक करत कॉमेंटचा वर्षाव केला.(Kunjika Kalwint)
या मालिकेतील मधुरा देशपांडे हिने या आधी असाच मंदिराच्या कळसावर चढत असतानाच एक सीन शूट केला होता. तेव्हा देखील मधुराचे सर्वत्र कौतुक झाले होते. तसेच अभिनेत्री कुंजिका काळवींट ही स्वामिनी या मालिकेतून घराघरात पोहचली. त्यांनन्तर तिने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.