Sunil Grover Birthday : चित्रपट, नाटक, रिएलिटी शो, कॉमेडी शो मनोरंजनाच्या अशा विविध माध्यमातून कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. या कलाकारांपैकी विनोदासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर. हटके विनोदी शैली, विनोदाचं अचूक टायमिंग या गोष्टींसाठी अभिनेता सुनील ग्रोव्हर ओळखला जातो. आज (३ ऑगस्ट) सुनील ग्रोव्हर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक टीव्ही शोज, चित्रपट, वेबसिरीज यांच्या माध्यमातून सुनीलने प्रेक्षकांचं मनोरंजन सुरु केलं आहे. विशेष करून ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमातून सुनीलला खास ओळख मिळाली. या नंतर अनेक चित्रपटांमध्ये देखील सुनील ने भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटात देखील सुनील झळकणार आहे.
हरियाणातील सिरसा या जिल्ह्यात सुनीलचा जन्म झाला. सुनीलचा आजवरचा संघर्ष सरळ, सोप्पा न्हवता असं त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितलं. त्याच्या आयुष्यातील पहिली कमाई किती होती याचा खुलासा त्याने मुलाखतीत केला होता. सुनीलने सांगितले “सुरुवातीच्या काळात मला माझ्या कामाचे केवळ ५०० रुपये मिळायचे. मला वाटलं न्हवत कि मला तेवढं यश मिळेल”.(Sunil Grover Struggle Story)

सुनील ने त्याच्या अभिनयाची सुरुवात अजय देवगणच्या ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातून केली. त्या नंतर पुन्हा एकदा तो अजय देवगण सोबत ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली. शिवाय ‘गजनी’, ‘पटाखा’, ‘भारत’, ‘कॉफी विथ डी’, ‘गब्बर इज बॅक’, ‘गुड बाय’, ‘बागी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सुनीलने अनेक भूमिका निभावल्या आहेत.मनोरंजन विश्वात पाय घट्ट रोवण्यासाठी सुनील अनेक नकार पचवावे लागेल आहेत. कठीण काळात अनेक लोकांनी त्याची साथ सोडली असं ही त्याने त्या मुलाखतीत सांगितले होते.
हे देखील वाचा – OMG 2 : ‘ओएमजी २’च्या ट्रेलरचा थरार, भगवान शंकराच्या भूमिकेत अक्षय कुमार, पंकज त्रिपाठीनेही वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहिलात का?
चित्रपटां व्यतिरिक कॉमेडी नाईट्स विथ कपिल या प्रसिद्ध शो मधील सुनीलने साकारलेले ‘डॉक्टर गुलाटी’,’गुत्थी’, ‘रिंकू भाभी’ ही पात्र विशेष प्रसिद्ध झाली. कॉमेडी नाईट्स विथ कपिल कार्यक्रमाचा होस्ट अभिनेता कपिल शर्मा आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर यांच्यातीळ मतभेदाच्या चर्चा देखील मध्यंतरी सर्वत्र पसरत होत्या.(sunil grover comedy nights with kapil)