शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कलाकार झाले सेवेकरी! वारकऱ्यांच्या सेवेत आदेश बांदेकर दंग, पायांना मसाज केला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 pandharpur wari news

Video : कलाकार झाले सेवेकरी! वारकऱ्यांच्या सेवेत आदेश बांदेकर दंग, पायांना मसाज केला अन्…

 pandharpur wari news : आषाढी वारी ही महाराष्ट्राची एक धार्मिक परंपरा आहे. जी शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात चालत आली आहे. आषाढ महिना आला की, लाखो भक्तांना ओढ लागते ती म्हणजे पंढरपूरला भेटण्याची. ज्यामुळे असंख्य वारकरी प्रस्थान सोहळे करत विठूरायच्या गजरात पंढरपुरच्या दिशेने पायी चालत जातात. भजन कीर्तन करीत विठूरायाला भेटण्यासाठी लाखों मैल पायवारी करतात. रात्रंदिवस पायवारी करत ही विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झाल्यामुळे त्यांना शारीरिक कष्टात ही सुख वाटते. रोज चालणं आणि ऊन-पावसाची पर्वा न करता विठ्ठल भेटीसाठी वारकऱ्यांच मन विठूरायच्या दिशेने चालत राहतं.

बहुतेक जणांना या वारीत त्यांचा कामामुळे सहभागी होता येत नाही. ज्यामुळे ते वेळ मिळाल्यावर वारकरांच्या सेवेसाठी सहभागी होतात. ज्यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा देखील समावेश होतो. तर अशातच स्टार प्रवाह वाहिनी वरील काही कलाकार मंडळीसुद्धा या वारी सोहळ्यात सहभागी होताना दिसले. तर स्टार प्रवाह वरील वारी सोहळ्याचे निवेदन अभिनेता आदेश बांदेकर करत आहेत. ज्यामध्ये त्यांनी विठुरायाच्या गजरासह वारी सोहळ्यातील सहभागी असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा करतानाही दिसली.

आणखी वाचा – शेफाली जरीवालाच्या शोकसभेत ढसाढसा रडले वडील, सासऱ्यांना सांभाळत राहिला पराग त्यागी, भावुक Video Viral

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

नुकतेच स्टार प्रवाहने त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये अभिनेता सुमित पुसावळे, अभिनेता उदय नेने आणि अभिनेता आदेश बांदेकर यांनी दिवसभर चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांची मालिश करुन त्यांची सेवा केली. या कलाकरांच्या सेवेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांच्या या कृतीच कौतुक देखील केलं. “खूप छान, हीच खरी ईश्वरी सेवा,उत्तम सेवा” असं लिहीत उत्तम प्रतिसाद ही दिला.

आणखी वाचा – २५ वर्षांनंतर नियती राजवाडेचं मालिकाविश्वात कमबॅक, ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकेतून छोटा पडदा गाजवणार

स्टार प्रवाह वाहिनीच्या उदय नेने आणि सुमित पुसावळे या कलाकारांसह अभिनेते आदेश बांदेकरही या सेवेत मग्न झाले आहेत. मलम लावत त्यांनी वारकऱ्यांच्या पायाला मालिश केली आहे. सध्या कलाकारांच्या सेवेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आणि चाहत्यांसह अनेक प्रेक्षक मंडळीही या व्हिडीओला पंसती दर्शवित आहेत.

Tags: Aadesh Bandekarmarathi actorPandharpur Wari
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
Next Post
pahlaj nihalani on akshay kumar

सहा व्हॅनिटी हव्यात, रात्री ड्रग्ज द्यायचे आणि...; बॉलिवूड कलाकारांचं काळं सत्य, सुप्रसिद्ध निर्मात्याने सगळंच सांगितलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.