स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. २०२१मध्ये सुरु झालेली ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अप्पू-शशांकची प्रेमळ केमिस्ट्री आणि कानिटकर कुटुंबाची सुंदर नात्यांची गोष्ट यामुळे ही मालिका अवघ्या काही काळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेने काही महिन्यांपूर्वी ५०० भागांचा गाठला होता. तसेच यात अनेक ट्विस्टदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. मालिकेचं कथानक आणि पात्रांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. पण, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून कलाकारांनी सेटवरील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (thipkyanchi rangoli last day shoot)
मालिकेत ‘अप्पू’ (अपूर्वा) ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तिने तिच्या घरातील एक फोटो शेअर केला, ज्याला कॅप्शन देताना लिहिते, “हाय अप्पू…आज रात्री मला निद्रानाशाचा खूप त्रास होईल. कारण आम्ही दोघं उद्या आमच्या आवडत्या ठिकाणी भेटणार आहोत. मी कल्पना करू शकत नाही की, हा शेवटचा दिवस असेल. ‘कानिटकर वाडा’ उद्या आपला दिवस साजरा करूया. लवकरच भेटू”. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने मेकअप रूममधील एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तिच्यासह सुमी म्हणजे नम्रता प्रधान दिसते. ती यामध्ये म्हणाली, “गुड मॉर्निंग सुमन, हे आमचं ‘ठिपक्यांची रांगोळी’च्या सेटवरील शेवटची गुड मॉर्निंग असेल.” तसेच याच सेटवरील आणखी एक व्हिडीओ तिने शेअर केला. ज्याला “हाय अप्पू, आजचा हा दिवस अविस्मरणीय बनवूया.”, असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – “प्रत्येक गोष्टीमध्ये तो…”, सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना ढसाढसा रडू लागली अंकिता लोखंडे, म्हणाली, “तो माझं कुटुंब आहे कारण…”

त्याचबरोबर शशांक म्हणजे अभिनेता चेतन वडनेरे यानेही एका फॅनपेजचा व्हिडीओ त्याच्या स्टोरीला शेअर केला. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं, “मला विश्वास बसत नाही. आज या मालिकेचा शेवटचं शूट असेल. खूप खूप आभार की तुम्ही एवढं प्रेम दिलं. खरंच जसं तुम्ही काम केलं ते प्रेक्षकांच्या मनात बसलं. असाच एक प्रोजेक्ट घेऊन आमच्या भेटीला या हीच देवा चरणी प्रार्थना. तुम्ही प्रत्येकाने काम खूप सुंदरपणे केलं आहे.” तर अभिनेता स्वप्नील काळेने मालिकेच्या सेटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत ज्ञानदा व चेतनसह अभिनेते उदय टिकेकर, अतुल तोडणकर, राजन ताम्हाणे, मंगेश कदम, लीना भागवत, सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान, सई कल्याणकर आदी प्रमुख भूमिकेत होते. आता या मालिकेच्या जागी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका नव्या वेळेत भेटीला येणार आहे. ज्यात जयदीप व गौरी यांच्या पुनर्जन्माची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.