सोमवार, डिसेंबर 11, 2023
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

Video : डिपफेक व्हिडीओनंतर रश्मिका मंदानाची झाली आहे अशी अवस्था, घाबरलेल्या अवस्थेत दिसली अन्…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरbyस्नेहा गावकर
नोव्हेंबर 8, 2023 | 3:04 pm
in Bollywood Gossip
Reading Time: 3 mins read
google-news
Rashmika Mandanna Viral Video

Video : डिपफेक व्हिडीओनंतर रश्मिका मंदानाची झाली आहे अशी अवस्था, घाबरलेल्या अवस्थेत दिसली अन्…; व्हिडीओ व्हायरल

सध्या सिनेसृष्टीत डीपफेक व्हिडिओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रश्मिका मंदानाचा फेक व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेचच कतरीना कैफ हिच्या फेक फोटोने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्री पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली. मात्र ती खूपच घाबरलेली दिसली आहे. रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. (Rashmika Mandanna Viral Video)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रश्मिकाचा एक अश्लील बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आणि हा व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओने सर्वत्र खळबळ उडवून दिली. यासह, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडीओ काढून टाकण्यात यावा तसेच व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर तक्रार करण्यात यावी असं बोललं जातं आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका पापाराझींना टाळताना दिसली. तसेच यावेळी ती घाबरलेली ही दिसली.

आणखी वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, ज्ञानदा रामतीर्थकर झाली भावुक, म्हणाली, “‘कानिटकर वाडा’…”

या व्हिडिओने संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजवली आहे आणि अमिताभ बच्चनसारख्या अनेक बड्या सिनेतारकांनी या गुन्ह्यावर कारवाईची मागणी करत रश्मिकाला पाठिंबा दर्शविला आहे. आता त्या व्हिडिओनंतर रश्मिका पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर दिसली. टी-सीरिजच्या ऑफिसमधून बाहेर पडताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी रश्मिका खूपच घाबरलेली दिसत होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत रश्मिकाला पाठिंबा दर्शविला आहे. रश्मिका सध्या तिच्या रणबीर कपूरबरोबरच्या ‘ऍनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – “प्रत्येक गोष्टीमध्ये तो…”, सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना ढसाढसा रडू लागली अंकिता लोखंडे, म्हणाली, “तो माझं कुटुंब आहे कारण…”

रश्मिका मंदानाने तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत इंस्टाग्राम पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं की, “माझा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालं आहे. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत.”

Tags: entertainmentRashmika Mandana Video Viralrashmika mandannasouth actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

pooja sawant attend musafira music launch event paparazzi asked her where is jiju and actress blushed
Marathi Masala

Video : “जीजू कुठे आहेत?”, प्रश्न विचारताच लाजली पूजा सावंत, हसतच राहिली अन्…; म्हणाली, “ते लवकरच…”

डिसेंबर 11, 2023 | 7:15 pm
(marathi actress kranti redkar praised maharashtra deputy cm devendra fadnavis with video
Marathi Masala

“सत्ता येते जाते पण…”, देवेंद्र फडणवीसांना उद्देशून क्रांती रेडकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “खुर्ची पणाला लावून ते फक्त…”

डिसेंबर 11, 2023 | 6:26 pm
Shweta Shinde On Family
Marathi Masala

“मला दुसरं मुल हवं होतं पण…”, श्वेता शिंदेचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “सरोगसीचा प्रयत्न…”

डिसेंबर 11, 2023 | 6:19 pm
aditya roy Kapoor beaks silence
Bollywood Gossip

अनन्या पांडेला डेट करण्याबाबत आदित्य रॉयचा खुलासा, करण जोहरने प्रश्न विचारताच म्हणाला, “मी प्रेम…”

डिसेंबर 11, 2023 | 5:53 pm
Next Post
aishwarya sharma fight with ankita lokhande and abhishek kumar over kitchen duty

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व ऐश्वर्या शर्मामध्ये जोरदार भांडण, जोडीदारांनीही डोक्याला लावला हात, अभिनेत्रीचा स्वतःवरील ताबा सुटला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist