शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Sukh Mhanje Nakki Kay Asta ही मराठी मालिका आता हिंदीमध्ये, गौरी फेम अभिनेत्रीने दिली माहिती, कधी व कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 7, 2024 | 9:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Star Pravah channel Sukh Mhanje Nakki Kay Asta serial will now be dubbed and aired in Hindi

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका आता हिंदीमध्ये, जयदीप व गौरी आता मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार

मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये टेलिव्हिजन हे माध्यम प्रेक्षकांसाठी अधिक सोयीचे माध्यम असते. त्यामुळे छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा अविभाज्य भाग असतात. छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यापैकी वर्क मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका. छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेल्या मालिकांमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे नावदेखील अग्रक्रमी आहे. एका श्रीमंत घरात काम करण्यापासून सुरू झालेला गौरीचा प्रवास त्याच घराची मालकीण बनण्यापर्यंत कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. (Sukh Mhanje Nakki Kay Asta in Hindi)

जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत येणारे अनेक नवनवीन ट्विस्ट या मालिकेची प्रेक्षकसंख्या वाढवत आहेत. अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकसंख्येत आणखी वाढ होणार असून ही प्रेक्षकसंख्या हिंदी असणार आहे. कारण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मराठी मालिका आता हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबद्दल अभिनेत्री गिरीजा प्रभूने स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Girija prabhu (@girijaprabhu_official)

आणखी वाचा – राहुल वैद्यने वांद्रेमध्ये खरेदी केलं आलिशान घर, इतका केला खर्च, दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली कोट्यवधींची कार

अभिनेत्री गिरीजा प्रभूसह स्टार प्लस या हिंदी वाहिनीने देखील सुख1म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे पोस्टर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मराठी मालिका तुम क्या मिले या नावाने हिंदीमध्ये डब होणार असून ही हिंदी मालिका प्रेक्षकांना स्टार प्लस व डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर पाहता येणार आहे. सकाळी ११.३० वाजता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना हिंदीमध्ये पाहता येणार आहे.

आणखी वाचा – 07 November Horoscope : मिथुन, कर्क आणि धनु राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा गुरुवारी पूर्ण होणार, बाकींसाठी दिवस कसा? जाणून घ्या…

दरम्यान, मराठी मालिका हिंदी मध्ये डब होऊन हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हे मराठी कलाकार तसेच तंत्रज्ञ लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मराठी प्रेक्षकांसाठीदेखील ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अशा अनेक प्रतिक्रिया देखील प्रेक्षकांनिया व्यक्त केल्या आहेत. अभिनंदन शुभेच्छा मेहनत फळाला आली यांसारख्या अनेक प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी मुख्य कलाकार व इतर सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत व त्यांचे अभिनंदन केलं आहे

Tags: Marathi Serial NewsSukh Mhanje Nakki Kay Asta in HindiSukh Mhanje Nakki Kay Asta Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींची प्रकृती खालावली, दामिनीची चाल ठरली यशस्वी, पारूवर आरोप करत सगळ्यांच्या नजरेतून पाडलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.