kritika Malik Crying : युट्युबर अरमान मलिक आणि त्याचं कुटुंब नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक रील व्हिडीओ बनवत मलिक कुटुंब साऱ्यांच्या मनात घर करतात. त्यांच्या व्हिडीओलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. मात्र आता मलिक कुटुंबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अरमान मलिकचा धाकटा लेक जैद आजारी आहे. त्याच्या आजारपणाबत कळताच अरमान मलिकच्या दोन्ही बायका कृतिका आणि पायल यांना रडू आवरेना झालं आहे. कृतिका मलिकचा मुलगा जैद फक्त २ वर्षांचा आहे. मुलाच्या आजाराबद्दल कृतिकाला कळताच, तिचे रडणे थांबत नाही आहे. त्याच वेळी, तिने अशी विनंती केली आहे की, तिच्या मुलाबद्दल कोणीही काहीही वाईट बरळू नये.
कृपया कृतिका मलिक आणि अरमान मलिकचा मुलगा जैद याला रिकेट्स हा आजार झाला आहे. जैदला रिकेट्स झाल्याचं कळलं तेव्हापासून मलिक कुटुंबात तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे. याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे, यावर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स पाहून कृतिकाने असं म्हटलं आहे की, तिच्या मुलांबद्दल कोणीही काहीही चुकीचे बोलू नका. रिकेट्स हा एक हाडांचा आजार आहे जो मुलांमध्ये होतो. या रोगात, मुलाच्या शरीरात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम किंवा फॉस्फेटची कमतरता जाणवते. या रोगामुळे, मुलांची हाडे सहजपणे तुटू शकतात आणि खंडित होऊ शकतात. जैदचा अहवाल आला तेव्हापासून कृतिका आणि पायल त्याच्या उपचारांमध्ये गुंतल्या आहेत.
आणखी वाचा – सायली संजीवचं मालिकाविश्वात कमबॅक?, म्हणाली, “नकारात्मक भूमिका…”
मलिक कुटुंबीयांनी तिचा नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने जैदला रुग्णालयात नेले आहे आणि त्याच्या चाचण्या सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. चाचणी घेताना जैद खूप रडत आहे. त्याची प्रकृती कृतिकाला पाहवली जात नाही, म्हणूनच पायलने जैदला घेतलं आहे. ६ एप्रिल २०२३ रोजी कृतिका मलिकने मुलाला जन्म दिला. जैद जन्मापासूनच थोडा आजारी आहे. कित्येक वेळा कृतिकाने तिच्या व्लॉगमध्ये मुलाच्या तब्येतीबद्दल सांगितले होते. आता चाचणी घेतल्यानंतर, जैदच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती कळेल.