सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पुष्पा २’ फेम अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा, हिंदी चित्रपटांमध्ये काम न करण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाला, “खूप कठीण…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 30, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
allu arjun on bollywood movies

अल्लू अर्जुनने हिंदी चित्रपटांमध्ये काम न करण्याचं सांगितलं कारण

सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांतच म्हणजे येत्या ५ डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. २०२१ साली आलेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. आता दूसरा भाग येणार असून सर्वजण त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अल्लू अर्जुन व रश्मिका मंदना अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसून आले आहेत. दरम्यान एका मुलाखतीवेळी त्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम न करण्याबद्दल भाष्य केले होते. (allu arjun on bollywood movies)

‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अल्लू अर्जुन मुंबईमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याने खुलासा केला की दिग्दर्शक सुकुमारने त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी चांगला चित्रपट बनवण्याचे आश्वासन दिले होते. तो म्हणाला की, “हे खूप खास आहे. कारण गेल्या ६९ वर्षात कोणत्याही तेलगू अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता. हे माझ्या खूप मनात होतं. माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं यश आहे. हे केवळ सुकुमारमुळे शक्य झालं आहे”.

आणखी वाचा – कधीच आई होऊ शकत नाही ‘ही’ बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, ‘या’ गंभीर आजाराशी देतेय झुंज

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

याचवेळी अल्लू अर्जुनने संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्याबरोबर असलेल्या घनिष्ठ नात्याबद्दलदेखील भाष्य केले आहे. अल्लू अर्जुन म्हणाला की, “मी त्यांना हिंदी चित्रपट न करण्याबद्दल विचारायचो. ते म्हणायचे की नाही. ते मला पुन्हा विचारायचे की तुम्ही हिंदी चित्रपट का नाही करत? त्यावर मी म्हणायचो की मी कधीही हिंदी चित्रपट करणार नाही. कारण त्यावेळी हिंदी मनोरंजन चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची जागा निर्माण करणं खूप कठीण होतं”.

आणखी वाचा – गांवकरांच्या घरी रमली नवी सूनबाई, सुरु आहे अभिषेक गांवकरचा सुखी संसार, लग्नानंतरचे खेळ खेळण्यात दोघेही दंग अन्…

दरम्यान ‘पुष्पा २’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये रश्मिका मुख्य नायिका आहे. तसेच खलनायक म्हणून अभिनेता फहाद फाजील दिसून येणार आहे. लाल चंदन तस्करी यावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये दमदार फाईट सिक्वेस  पाहायला मिळणार आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.    

Tags: allu arjunbollywood moviepushpa 2
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
priyanka chopra mother statement

प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांना त्या निर्णयाचा पश्चाताप, स्वतः खुलासा करत म्हणाल्या, "मी खूप स्वार्थी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.