२०२१ च्या अखेरीस संपूर्ण देशभरात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा “पुष्पा : द राईज” चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला दक्षिणेतील प्रेक्षकांसह देश-विदेशातील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. इतकंच नव्हे, तर या चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवरही नाव कोरले आहे. चित्रपटातील डायलॉग्स, गाणी, ऍक्शन सीन्सची बरीच चर्चा झाली होती. शिवाय अल्लू अर्जुनसह संपूर्ण कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. जेव्हा चित्रपटाच्या पहिल्या भागातच दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती, तेव्हापासूनच चाहते व सिनेप्रेमी याची आतुरतेने वाट बघत आहे. (Pushpa 2 Release Date announced)
अशातच चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अखेर “पुष्पा २ : द रुल” चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट पुढील स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्टर शेअर करत ही घोषणा केली आहे.
हे देखील वाचा – “हिच्याशिवाय कसं जगता येईल?”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिज्ञा भावेची भावुक पोस्ट, म्हणाली, “ती असताना…”
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा १’ हा पहिला पॅन इंडिया चित्रपट होता. चित्रपटाची पटकथा, गाणी आणि अल्लू अर्जुनचा सिग्नेचर डायलॉग “मैं झुकेगा नही साला” तुफान प्रसिद्ध झाला. चित्रपटाच्या पहिल्या भागापासूनच चाहते आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली असून निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
हे देखील वाचा – “तुम्हाला लाज वाटत नाही का?”, लेकाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवरच भडकला सनी देओल, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “राग आला कारण…”
Mark the Date ❤️🔥❤️🔥
— Pushpa (@PushpaMovie) September 11, 2023
15th AUG 2024 – #Pushpa2TheRule Grand Release Worldwide 🔥🔥
PUSHPA RAJ IS COMING BACK TO CONQUER THE BOX OFFICE 💥💥
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku #FahadhFaasil @ThisIsDSP @MythriOfficial @SukumarWritings @TSeries pic.twitter.com/xQZwvdqC8F
दरम्यान, याआधी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स शेअर केलेले आहे. चित्रपटाचा पहिला टीझर व मुख्य अभिनेत्याचा लुक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटोजदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू असून अल्लू अर्जुनसह अन्य कलाकारांना मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यास प्रेक्षक आतुरलेले आहे.