दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. ‘पुष्पा २’च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने या घटनेला अल्लू अर्जुन जबाबदार असल्याचे म्हंटले होते. दरम्यान हैद्राबाद पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणीदेखील करण्यात आली. यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयिन कोठडीदेखील सुनावण्यात आली. या सगळ्या प्रकारानंतर मनोरंजन विश्वाला मोठा धक्कादेखील बसला. तसेच अनेक कलाकारांनी हे चुकीचं असल्याचे मत सोशल मीडियाच्या माध्यामातून मांडण्यात आले होते. तसेच नेटकऱ्यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे. अशातच आता अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (Pushpa 2 Allu Arjun Arrested)
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर मृत महिलेचा पती भास्करने तक्रार मागे घेण्याबद्दल भाष्य केले होते. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर मृत महिलेचा पती भास्कर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी तक्रार मागे घेण्यासाठी तयार आहे. मला अल्लू अर्जुनच्या अटकेसंदर्भात कोणतीही कल्पना नव्हती. चेंगराचेंगरीमध्ये माझ्या पत्नीचा मृत्यू झाला त्याच्याशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही”. भास्करच्या या वक्तव्यानंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता.
अशातच आता अल्लू अर्जुनला अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणा उच्चन्यायालयाने अल्लू अर्जुनचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान याआधी मृत महिलेच्या पतीने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मिळाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.
आणखी वाचा – किरण गायकवाडचा साखरपुडा संपन्न, साधेपणाची होतेय सर्वाधिक चर्चा, लूकने वेधलं लक्ष
चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. अर्जुनने देखील त्या महिलेच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासनदेखील दिले होते. त्याने कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर करुन संपूर्ण चाहतावर्गाची माफीदेखील मागितली होती. या मदतीमुळे कदाचित त्या महिलेच्या पतीने तक्रार मागे घेण्याचा विचार केला असावा असे अंदाज बांधले जात आहेत.