गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’चे दिग्दर्शक सुकुमार सोडणार चित्रपटसृष्टी?, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा अल्लू अर्जुनवर निशाणा, म्हणाले, “हा जबाबदार…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 25, 2024 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pushpa 2 director sukumar

'पुष्पा २' चे दिग्दर्शक चित्रपटसृष्टी सोडण्याला अल्लू अर्जुन जबाबदार

सध्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने जगभरात कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दुसऱ्या भागामध्ये जाहीर करण्यात आले होते. मात्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे यश साजरे करत असतानाच गालबोट लागले. ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ४ डिसेंबर रोजी हैद्राबाद येथील प्रीमियर सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. (pushpa 2 director sukumar)

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर त्याला लगेचच अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. तसेच त्यानंतर काही दिवसांत त्याच्या घरावर हल्लादेखील करण्यात आला होता. दरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणी मंगळवारी अल्लू अर्जुनची पोलिसांकडून कसून चौकशीदेखील करण्यात आली होती. यावेळी दिग्दर्शक सुकुमार हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे बघायला मिळाले. मात्र अशातच आता सुकुमार यांनी एक वक्तव्य करत चाहत्यांना जोरदार झटका दिला आहे.

आणखी वाचा – यंदाचं वर्ष या कलाकरांसाठी ठरलं लकी, घरी नव्या पाहुण्याचं आगमन, काहींनी लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर केलं बाळाचं प्लॅनिंग

View this post on Instagram

A post shared by Sukumar B (@aryasukku)

सुकुमार नुकतेच हैद्राबाद येथील एका सोहळ्यामध्ये उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी मनोरंजन क्षेत्र सोडणार असल्याची घोषणा केली आहे. सुकुमार यांचे हे वक्तव्य ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुकुमार यांच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेता राम चरणदेखील सहभागी झाला होता. यावेळी सुकुमार यांना विचारले की, “अशी एक कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सोडायची आहे?”, यावर सुकुमार यांनी उत्तर दिले की, ‘चित्रपट”. सुकुमार यांचे उत्तर ऐकून राम चरणला देखील आश्चर्य वाटले. तो लगेच सुकुमार यांच्या हातातील माइक खेचून घेतो. तसेच असे काहीही होणार नसल्याचे तो सांगतो.

आणखी वाचा – अखेर ‘तो’ क्षण आला, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात, मुहूर्त सोहळा संपन्न

सुकुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे सगळं संध्या थिएटरमध्ये घडलेल्या प्रसंगामुळे झाले आहे”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “अल्लू अर्जुनमुळे सुकुमार चिंतेत आहेत”.  त्यामुळे खरंच सुकुमार चित्रपटसृष्टी सोडणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.  

Tags: allu arjunmovie directorpushpa 2sukumar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Anushka Sharma On RCB Victory Parade Turns Stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

जून 5, 2025 | 12:01 pm
Vivek oberoi on bengaluru stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

जून 5, 2025 | 11:28 am
 Hina Khan Trolled After Marriage
Entertainment

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

जून 5, 2025 | 11:20 am
Hina Khan Wedding
Entertainment

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, अखेर अडकले लग्नबंधनात

जून 5, 2025 | 11:00 am
Next Post
tejashri pradhan on marathi movie

तेजश्री प्रधानच्या चित्रपटाला महाराष्ट्रातच मिळेना थिएटर, अभिनेत्री भडकली, म्हणाली, "दुर्दैव आहे की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.