बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची लगीनघाई, दोघेही जयपूरला रवाना, Wedding Glowने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 23, 2026 | 10:33 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Rashmika Mandanna & Vijay Deverakonda

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाची लगीनघाई, दोघेही जयपूरला रवाना, Wedding Glowने वेधलं लक्ष

Rashmika Mandanna & Vijay Deverakonda : साउथ इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोडपे रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर आता त्यांच्या लग्नाच्या बातमीवर दोघांनी शिक्कामोर्तब केला आहे. रश्मिका आणि विजय पुढील आठवड्यात उदयपूरमध्ये एका खासगी समारंभात लग्न करणार आहेत. मात्र, दोघांनी अद्याप याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. पण रविवारी त्यांनी आपापल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर करून त्यांच्या लग्नाची पुष्टी केली. दोघांच्या लग्नाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

रश्मिका आणि विजय यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, “आमच्या प्रिय मित्रांनो. आम्ही कोणतीही योजना करण्यापूर्वी, आम्ही स्वतःसाठी काहीही निवडण्यापूर्वी – तुम्ही आधीच आमच्याबरोबर होता. तुम्ही आम्हाला खूप प्रेमाने नाव दिलेत. तुम्ही आम्हाला ‘विरोश’ म्हणता. म्हणून आज – आमच्या सर्व अंतःकरणाने, आम्ही हा संघ तुमच्या सन्मानार्थ समर्पित करतो. त्यांनी पुढे लिहिले, “आम्हाला त्याचे नाव ‘विरोश की शादी’ (रेड हार्ट इमोजी) ठेवायचे आहे”.

आणखी वाचा – ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर! गृहप्रवेशाचे फोटो समोर, प्रेक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हैदराबादमध्ये शांतपणे साखरपुडा समारंभ उरकला आणि आता ते २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये अंगठी घालण्याचा कार्यक्रम केला. ‘गीता गोविंदम’ (2018) आणि ‘डियर कॉम्रेड’ (2019) मध्ये एकत्र काम केल्यापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवा सुरु होत्या.

आणखी वाचा – “लिमिट्स क्रॉस करू नकोस”, भाऊच्या धक्क्यावर राखी-रुचितामध्ये राडा, “तुम्ही लवलपाटा करता…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले होते की रश्मिका आणि विजय २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमधील ऐतिहासिक राजवाड्यात लग्न करणार आहेत. हैदराबादला परतल्यानंतर तो आपल्या चित्रपट मित्रांसाठी रिसेप्शनही आयोजित करणार आहे. दरम्यान आता रश्मिका आणि विजय त्यांच्या टीमसह एयरपोर्टला स्पॉट झाले आणि दोघेही जयपूरच्या दिशेने रवाना होताना दिसले. यावरुन आता दोघांची लगीनघाई सुरु झाली असल्याचं समोर आलं आहे.

Tags: entertainmentRashmika Mandanna & Vijay Deverakondasouth idustry
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Aetasha-Nishad Wedding

'स्टारप्रवाह'वरचा लोकप्रिय चेहरा अडकला लग्नबंधनात; सेटवरच जुळलं प्रेम, चार वर्षांचं रिलेशन आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.