आरआरआर फेम आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि पत्नी उपासना यांना २० जून २०२३ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले आहे.१९ जून रोजी उपासनाला हैदराबाद मधील अपोलो रुग्नालयात दाखल केले होते. लग्नाच्या ११ वर्षांनंतर २० जून रोजी उपसनाने गोंडस मुलीला जन्म दिला.आई आणि बाळा दोघांची ही प्रकृती ठीक असल्याची बातमी हॉस्पिटलच्या बुलेटिनद्वारे देण्यात आली आहे. (Ram Charan Bless With Baby)
राम चरण हा साउथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे,त्यामुळे चिरंजीवी आणि त्यांची पत्नी सुरेखा हे देखील आजोबा-आजी झाले आहेत. घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. तसेच, चाहते देखील ही बातमी समजल्या नंतर रामचरण आणि उपासना यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
लग्नाच्या ११ वर्षानंतर राम चरण आणि उपासना झाले आई-बाबा. (Ram Charan Bless With Baby)
स्वतःचा संसार, लग्न, मुलं झाल्यांनतर अनेक जोडपी कुटुंबापासून वेगळे राहतात. पंरतु याबाबतचा रामचरण आणि उपासना यांचा निर्णय वेगळा आहे, याबद्दल एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला आहे, उपासना म्हणाली, मुलं झाल्यानंतर लोक वेगळी राहतात, पण आम्ही या विरुद्ध करणार आहोत,आम्ही आता पर्यंत दोघेच राहायचो. पण, बाळाच्या जन्मानंतर आमही रामचरणच्या कुटुंबासोबत राहणार आहोत.बाळासाठी आजी-आजोबांचं महत्व खूप असत.आमच्या बाळालाही आजी-आजोबांचं भरभरून प्रेम मिळावं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.(Ram Charan Bless With Baby)
हे देखील वाचा : सनी देओलच्या मुलाच्या लग्नात आजी हेमा मालिनी गैरहजर-चर्चेला उधाण
तसेच बाळाच्या जन्माच्या काही तास आधी राम चरणने काही तास आधी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली होती त्यात, त्याने संगीतकार काल भैरवने त्यांच्या बाळासाठी बनवलेली एक ट्यून शेअर केली होती, त्यासोबत त्याच्या आणि उपसणाच्या वतीने राम चरणने काल भैरवचे आभार मानले आहेत.
