शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तीन वर्षांपूर्वी समंथाबरोबर घटस्फोट, आता नागा चैतन्यने सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर केला साखरपुडा, लवकरच लग्नबंधनात अडकणार

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 8, 2024 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Naga Chaitnya and Shobhita Dhulipala engagement

नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा पार पडला

Naga Chaitnya and Shobhita Dhulipala engagement : साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य हा अभिनय क्षेत्रात अधिक प्रसिद्ध आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तो खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिला आहे. नागा चैतन्यने २०१७ साली समंथा रुथ प्रभूबरोबर लग्नबंधनात अडकला. दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले होते. समंथादेखील साऊथमधील एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दोघांच्याही लग्नासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र लग्नाच्या काही वर्षातच दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोटाची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाली होती.

नागा चैतन्य व समंथा यांचा घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य व अभिनेत्री शोभिता धुलिपाला हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच आता दोघांचाही साखरपुडा पार पडला आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. नागार्जुन यांनी स्वतः सोशल मीडिया हँडलवरुन फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की माझा मुलगा नागा चैतन्य व शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा आज सकलाई ९ वाजून ४२ मिनिटांनी पार पडला. आम्ही तिचे या घरात स्वागत करण्यास खूप उत्सुक आहोत. नवीन जोडप्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आयुष्यभर असेच आनंदी राहा. 8.8.8 प्रेमाची सुरुवात”.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi : एकीकडे वैभवमध्ये अडकला आर्याचा जीव, तर दुसरीकडे इरिना त्याच्यासाठीच बनवत आहे जेवण, Love Triangle ला सुरुवात

"We are delighted to announce the engagement of our son, Naga Chaitanya, to Sobhita Dhulipala, which took place this morning at 9:42 a.m.!!
We are overjoyed to welcome her into our family.
Congratulations to the happy couple!
Wishing them a lifetime of love and happiness. 💐… pic.twitter.com/buiBGa52lD

— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) August 8, 2024

दरम्यान नागा चैतन्य व शोभिता यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही. दोघांच्याही चाहत्यांना खूप आनंद झालेलादेखील दिसून येत आहे. नागार्जुन यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी पसंती दिली असून शुभेच्छांचा वर्षावदेखील केला आहे.   

आणखी वाचा – “रात्री उपाशीच झोपलात का?”, प्रसाद ओकने बायकोबरोबर शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले, “डेंजर आहात…”

दरम्यान शोभिताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तिने आजवर अनेक हिंदी, तमिळ, तेलगू अशा भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक वेबसीरिजमध्येही महत्त्वाच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. ‘द नाइट मॅनेजर’, “पोन्नियन सेलवान’, ‘मेजर’, ‘द बॉडी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये केलेल्या तिच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली आहे.

Tags: Engagementnaga chaitanyanagarjun postshobhita dhulipala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Arbaaz Patel and Nikki Tamboli danced to the song Hill Pori Hila.

Video : अरबाज-निक्कीचा मराठमोळ्या गाण्यावर Bigg Boss Marathi च्या घरात भन्नाट डान्स, उलचून घेत किस केलं अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.