Bigg Boss Marathi 5 : मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री उर्षा उसगांवकर. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांची प्रत्येक भूमिका आजही अनेक प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावरही मालिकेत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. अशातच वर्षा यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केला आहे. त्यांच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेशावर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याआधी त्यांच्या चर्चा होत्याच आणि आता ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतरही त्यांच्या नावाच्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Varsha Usgaonkar)
‘बिग बॉस’च्या घरात वर्षा ताईंचा निक्कीकडून अनेकदा अपमान झाला असून त्यांना नको नको ते बोललं गेलं आहे. मात्र त्या परिस्थितीत त्यांनी शांत राहत कोणतीचं प्रतिक्रिया न देत ती परिस्थिती सांभाळली आणि त्यांच्या याच कृतीचे अनेकांनी कौतुक केलं आहे. वर्षा यांच्या चाहत्यांना त्यांच्याबद्दल जितका आदर आहे,. तितकाच वर्षा यांना मदत करणाऱ्यांनादेखील आहे. तसंच वर्षा उसगांवकरांनादेखील त्यांच्या मदतनीसांचा आदर व अभिमान आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होण्याआधी वर्षा उसगांवकरांच्या मदतनीसांनी त्यांचे औक्षण केलं होतं. या औक्षणाचा व्हिडीओ वर्षा उसगांवकरांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – मराठी दिग्दर्शिकेच्या घरी झालेली चोरी, आरोपीला अटक झाल्यानंतर मोठा खुलासा, ड्रग्जसाठी पैसे खर्च केले अन्…
वर्षा उसगांवकरांनी हा खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “मी जेव्हा ‘बिग बॅास’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या या स्टाफने मला भरपुर पाठींबा दिला. त्यांच्याशिवाय या सिनेविश्वामध्ये इतकी वर्ष टिकणं, सर्व गोष्टी सांभाळणं अवघड असतं. पण त्यांच्यामुळे ते सहजतेने करु शकले. ‘बिग बॅास’च्या घरात जाण्याआधी ही त्यांनी माझी पुर्ण साथ दिली. माझे औक्षण करुन खुप प्रेमाने माझी ‘बिग बॉस’च्या घरी पाठवणी केली आणि सर्वांचे आभार. मला तुम्हा सर्वांची आठवण येत आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अंकिताने छोटा पुढारीला जमिनीवर लोळवलं, पाय धरुन मागे खेचलं अन्…; कोण कोणावर भारी पडणार?
दरम्यान, नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत व कॅप्टन निक्की तांबोळी हे चार स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे नॉमिनेशनवरील चर्चेदरम्यान अभिजीत व निक्की या आठडव्यात वर्षाताई घराबाहेर जाणार असल्याचे म्हणत आहेत. कारण पहिल्या आठडव्यानंतर त्यांचा या घरातील खेळ फारसा दिसून येत नाहीये.