कलासृष्टी बहारदार करणारा अजून एक महत्वाचा घटक म्हणजे गायक. आपल्याला कमल गायकी ने प्रत्येक चित्रपटाला एक वेगळी ओळख मिळवून देण्याचं काम गायक करत असतो. गायकांच्या युतीतील असच एक महत्वाचं नाव म्हणजे गायक सोनू निगम. बऱ्याच कालावधी पासून अनेक नवनवीन आणि अजरामर गीतांनी सोनू निगम यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण नुकताच एक शो दरम्यान सोनू निगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली असून त्यातील त्यांच्या एक सहकारी फार गंभीर जखमी झाला असून त्याला दवाखान्यात भरती केले गेले आहे.(sonu nigam)
चेंबूर येथे आयोजित एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरताना काही व्यक्तींनी सोनू निगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी धक्कबुकी केली त्याचे सोनू यांचे एक मित्र खाली पडले आणि त्यांना जखम झाली त्वरित त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर या संदर्भात सोनू निगम यांनी पोलीस स्थानकात धावघेत तक्रार केली आहे.
घडलेल्या प्रकारात आमचा जीव हि गेला असता असे सोनू निगम यांनी मीडियाशी साधलेल्या संवादात सांगितले. लोकांनी जबरदस्ती करून सेल्फी घेणं आणि त्यावरून वाद घालणं हे चुकीचं आहे किंवा त्यावरून कलाकारांच्या अंगावर धावून जाणं हे हि तितकाच चुकीचं आहे असं देखील सोनू निगम यांनी पत्रकारांशी झालेल्या मुलाखतीत सांगितलं.(sonu nigam)
तर या घटने मागे स्वप्नील फातर्पेकर नामक व्यक्तीचा हाथ असल्याचे समोर आले आहे. त्या संदर्भात चेंबूर पोलिस स्तहकांचे पोलीस उपायुक्त स्थानकाचे हेमराजसिंह राजपूत यांनी माहिती दिली आहे.
====
हे देखील वाचा- जीव माझा गुंतला मधील अभिनेत्याचा अपघात ‘जीव पेक्षा मोठं काही नाही’ म्हणत दिली माहिती
====
आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यास सगळेच जण उत्सुक असतात पण अशा वेळी इतर गोष्टींचं भान ठेवणं हि तितकंच गरजेचं देखील आहे.