रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मैत्रीणच झाली सवत! हिमेश रेशमियाने पहिल्या बायकोच्या मैत्रीणीबरोबरच थाटला होता दूसरा संसार, पत्नीनेच करून दिली होती ओळख

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 11, 2024 | 6:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Himesh Reshammiya had a second marriage with his first wife's friend

मैत्रीणच झाली सवत! हिमेश रेशमियाने पहिल्या बायकोच्या मैत्रीणीबरोबरच थाटला होता दूसरा संसार, पत्नीनेच करून दिली होती ओळख

बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया हे नाव माहीत नाही असं फारच क्वचित कोणीतरी असेल. हिमेश रेशमियाने आजवर अनेक हिट गाणी देत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारा हा गायक व  संगीतकार त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. हिमेशनं पूर्वश्रमीची पत्नी कोमलसोबतचं २२ वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवत घटस्फोट घेतला होता आणि त्यानंतर गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत लग्न केलं.

हिमेश रेशमियानं कोमलबरोबर १९९५मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर २२ वर्षांनी दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही रिपोर्ट्सनुसार सोनिया कपूरशी हिमेशची जवळीक वाढत गेल्यानं कोमल आणि हिमेशच्याअ नात्यात दुरावा आला असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र ही गोष्ट कोमलने अनेकदा नाकारली आहे. पण कोमलनेच आपल्या नवऱ्याची सोनियाबरोबर भेट घडवून आणली होती असं म्हटलं गेलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

हिमेश आणि कोमल ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते. त्याच बिल्डिंगमध्ये सोनिया राहत होती आणि त्यांच्या मैत्रीमुळे सोनिया वारंवार हिमेशच्या घरी जायची. एवढंच नाही तर हे दोघंही हिमेशचा घटस्फोट होण्याआधीच लिव्ह इनमध्ये राहत होते आणि हिमेश सोनियाचा सर्व खर्च करत होता असं बोललं जातं.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची तारीख समोर, अखेर लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, “आई-वडिलांपेक्षा…”

हिमेशने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून संगीत क्षेत्र निवडलं. मात्र गुजराती कुटुंबातून आलेल्या हिमेशचं लग्न हे वयाच्या २१ व्या वर्षीच कोमलशी झालं. २०१७ मध्ये लग्नाच्या २२ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र त्याआधी १२ वर्ष हिमेश आणि सोनिया नात्यात होते असं सांगण्यात येतं. अनेकदा सोनियाला घटस्फोटासाठी जबाबदार धरलं जातं. मात्र हिमेशच्या बायकोने हे साफ नाकारलं होतं.

आणखी वाचा – ‘मुरांबा’नंतर फारसे चित्रपट न केल्याबद्दल चिन्मयी सुमित यांचे वक्तव्य, म्हणाल्या, “घरासमोर निर्मात्यांच्या रांगा…”   

दरम्यान, साधारण १२ वर्ष हिमेश आणि सोनियाने एकमेकांना डेट केले. एकमेकांना साथ दिली. आपल्या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर १ वर्षाने सोनिया आणि हिमेशने लग्न केले. हिमेशचा मुलगा स्वयंदेखील या लग्नाला आला होता आणि हिमेश आणि सोनिया सुखाने संसार करत आहेत.

Tags: Bollywood entertainment newsbollywood singerHimesh Reshammiya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
12 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, तूळ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस महत्त्वाचा, करिअरमध्ये मिळणार यश आणि व्यवसायात लाभ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.