roshni walia News : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रोशनी वालियाने तिच्या अभिनय शैलीने रसिकांच्या मनात घर केलं. रोशनी वालियाने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत तिची प्रचंड ओळख बनविली. लवकरच ती ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये दिसणार आहे, ज्यात चाहते उत्सुकतेने तिला भेटण्याची वाट पाहत आहेत. रोशनी वालियाने नुकतीच हॉटरफ्लायला एका मुलाखतीत सांगितले की तिच्या आईने तिला एकटेच वाढवले आहे, कारण अभिनेत्रीच्या आईवडिलांचा फार पूर्वी घटस्फोट झाला होता. आईच्या संगोपनाबद्दल बोलताना रोशनी वालिया हिने असेही म्हटले आहे की, तिच्या नियमांमध्ये तिने कधीच तिला बांधून ठेवले नाही. त्याऐवजी स्वत: च्या जीवनाचा आनंद घेण्याचा सल्ला तिच्या आईने दिला.
रोशनी ‘हॉटरफ्लाय’च्या द मेल फेमिनिस्ट पॉडकास्टमध्ये सांगत होती की, तिची आई तिच्याशी कधीही कडक वागली नाही. रोशनी म्हणाली, “मी माझ्या आईशी कधीही खोटं बोलली नाही. मग ते एखाद्या मुलाला भेटायला जाताना असो किंवा त्याला घरी बोलावताना असो. मला वाटते की, स्ट्रिक्ट लोकांची मुलं जास्त बिघडलेली असतात”. रोशनी म्हणाली की, ‘तिच्या मैत्रिणी तिच्या आईबरोबर खूप एन्जॉय करतात. ते तिला आंटी म्हणत नाहीत, तर स्वीटी म्हणतात’.
आणखी वाचा – Tharala Tar Mag : सायलीने प्रियाच्या कानाखाली मारली अन्…; पूर्णा आजी व कल्पनाही भडकल्या, नवा प्रोमो समोर
रोशनीला विचारण्यात आले की, ती अशी तीन उदाहरणे देऊ शकते का की, ज्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत की, तिने तिच्या आईने सांगितली आहेत. त्यावर रोशनीने उत्तर दिले, “माझी आई नेहमीच मला कंडोम वापरायला सांगते. जर तू काहीही केले तरी कंडोम वापर. भारतीय घरांमध्ये ही अजूनही एक नवीन गोष्ट आहे. तिने माझ्या मोठ्या बहिणीला माझ्यापेक्षा जास्त सांगितले. कारण मी तेव्हा लहान होते आणि आता मी मोठी होत आहे”. रोशनीने सांगितले, तिची आई तिला सांगते की, “तू घरी खूप वेळ राहते, थोडं बाहेर जात जा”. तिची आई म्हणते, “बाहेर जा, पार्टी कर, मजा कर’ ती विचारते, तू आज दारू पिऊन आली नाही का? आज तुम्ही सगळे शांत दिसत आहात?”.
नंतर रोशनीने सांगितले की, ती पंजाबी आहे म्हणून हे सामान्य आहे. रोशनी म्हणाली की, “ती जे काही आहे, ते तिच्या आईमुळे आहे. तिने नवीन फोन मला देण्यासाठी तिचे सोने विकले”. रोशनी म्हणते की, “ती तिच्या मुलांसाठी अलाहाबादहून मुंबईला शिफ्ट झाली. अलाहाबादमधील १००० रुपये म्हणजे मुंबईत १०० रुपयांइतकेच आहेत. इथे खूप खर्च आहे”. रोशनी म्हणाली की, “तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आहे. तिची आई तिच्या मुलींसह अलाहाबादहून मुंबईत आली आणि इथे तिचे आयुष्य बदलले. रोशनी सातव्या वर्षी कुटुंबाबरोबर मुंबईत आली होती. त्यानंतर तिने एका जाहिरातीसाठी ऑडिशन दिले. ती त्याबद्दल सीरियस नव्हती; पण तिची निवड झाली”.





