सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर हनिमूनसाठी परदेशात पोहोचले सोहम-पूजा; ‘ते’ फोटो शेअर करत चाहत्यांना दाखवली खास झलक

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 31, 2025 | 12:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja & Soham International Trip

लग्नानंतर परदेशात पोहोचले सोहम-पूजा

Pooja & Soham International Trip : मराठी सिनेसृष्टीत सध्या ज्या लग्नसोहळ्याची सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेता सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा ग्रँड विवाहसोहळा. २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्याच्या सुंदर वातावरणात सोहम आणि पूजाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कुटुंबीय, जवळचे मित्र आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. लग्नानंतर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड रिसेप्शनने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

या रिसेप्शन सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे सोहम-पूजाच्या लग्नाची चर्चा केवळ मनोरंजन विश्वापुरती मर्यादित न राहता सर्वत्र रंगली. सोशल मीडियावर लग्नातील फोटो, व्हिडीओ आणि रिसेप्शनचे क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नानंतर लगेचच अभिनेत्री पूजा बिरारीने तिच्या ‘येडं लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर पुनरागमन केलं. लग्नानंतरही कामाविषयीची तिची कमिटमेंट पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं.

आणखी वाचा – सुनिधी चव्हाणच्या कॉन्सर्टमध्ये ‘कमळी’चा जबरदस्त डान्स; स्वतःच्या नावाच्या गाण्यावर नाचली अन् विजयाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नववर्षाचं स्वागत खास पद्धतीने करण्यासाठी सोहम आणि पूजा परदेशात पोहोचले आहेत. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही खास फोटो शेअर केले असून सध्या ते सिंगापूरमध्ये सुट्टीचा आनंद घेत असल्याचं समोर आलं आहे. या फोटोंना कॅप्शन देताना सोहम आणि पूजाने “Postcard from Singapore” असं लिहिलं असून परदेशातील सहलीचा उत्साह व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे येत्या २ जानेवारीला सोहम आणि पूजाच्या लग्नाला एक महिना पूर्ण होणार आहे. लग्नानंतर परदेशात नववर्ष साजरं करत असलेलं हे कपल सध्या चाहत्यांमध्ये चांगलंच चर्चेत आले आहेत.

आणखी वाचा – “मला कोणताही पश्चाताप नाही…”, अरबाज खानसोबतच्या घटस्फोटाबद्दल मलायका अरोरा स्पष्टच बोलली; म्हणाली, “घटस्फोट झाल्यानंतर…”

Tags: entertainmentmarathi entertainment newsPooja & Soham International Trip
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Ashwini Mahangade On Senior Actress Archana Patkar

"आपण खचलो तर…", आई कुठे… फेम अभिनेत्रीने अर्चना पाटकर यांच्यासाठी शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, "ती नकळत आपल्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.