Smriti Mandhana Wedding News: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्री, क्रिकेटविश्व् आणि सोशल मीडियावर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा प्रचंड चर्चेत असल्याचं पाह्यलं मिळालं होतं. भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं. महिला विश्वचषक जिंकल्यानंतर स्मृती हिने नात्याची अधिकृत घोषणा केलेली होती. स्मृती आणि पलाशचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण अचानक स्मृती-पलाशचं लग्न रद्द झाल्याची बातमी समोर आली. वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं लग्न पुढ ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली. तर हे लग्न अचानक रद्द झाल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
आता या प्रकरणात एका पाठोपाठ एक धक्कदायक खुलासे होतं आहेत. लग्न पुढे ढकलण्याच्या कारणांबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. दरम्यान, पलाश मुच्छलचे मेंरी डिकॉस्टा नावाच्या मुलीसोबतचे चॅट सोशल माध्यमावर व्हायरल झाली आहे. पलाशने स्मृती मानधनाचा विश्वासघात केल्याचे आणि तो मेरी डिकॉस्टा या एका मुलीसोबत चॅट करत असल्याचे कथीत स्क्रीन शॉट सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. तरस्मृती हिने इंस्टाग्राम अकाउंटवरून पलाश याच्यासोबत असलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलिट खेळायचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच स्मृतीने एका इंस्टाग्राम रीलद्वारे संगीतकार पलाश मुच्छलशी तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. यांनतर पलाशने मुंबईतील डीव्हाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीला लग्नासाठी मागणी घातली होती. तसेच त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. लग्नासाठी मागणी घातल्यानंतर त्यांच्या हळदी समारंभाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले. तर 23 नोव्हेंबर रोजी प्रत्येक जण दोघांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत असताना, अचानक लग्न पुढे ढकलल्याची माहिती समोर आली. तर सध्या सर्वत्र फक्त पलाश आणि स्मृती यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.





