बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सलग दोन वर्ष…”, मालिका सोडण्याबाबत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “अन्नातून विषबाधा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2025 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Isha Keskar Lakshmichya Pavalani Exit

"सलग दोन वर्ष…", मालिका सोडण्याबाबत 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, "अन्नातून विषबाधा…"

Isha Keskar Lakshmichya Pavalani Exit : ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली. मालिकेतील मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री इशा केसकरने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. इशा या मालिकेत कला ही भूमिका साकारत होती. आता कला मालिकेत दिसणार नाही या बातमीने तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. कलाने मालिका सोडल्यामुळे कला- अद्वैतचे फॅन्स दुखावले आहेत. आणि आता मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची नवीन नायिका म्हणून एण्ट्री झाली असली तरी ईशाने मालिका का सोडली याबाबत चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. आणि अखेर इशाने मालिका सोडण्यामागचे खरे कारण देखील सांगितले आहे.

इशाने नुकतीच ‘मुंबई टाईम्स’ला मुलाखत दिली. यावेळी इशा मालिका सोडण्याबाबत म्हणाली, “सलग दोन वर्ष मी काम करत होते. जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता. पण मी तशातच शूट करत होते. पण ती दुखापत वाढल्यानं डॉक्टरांनी मला काही दिवस विश्रांती घ्यायचा सल्ला दिला. मी आता विश्रांती घेतली नाही, तर भविष्यात डोळ्यावर छोटीसी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मग मी १५-२० दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही, त्यावेळी सारासार विचार करुन आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं”.

आणखी वाचा – “आमच्या लाडक्या पूजाचं केळवण…”, पूजा बिरारीची लगीनघाई, सहकलाकारांनी सेटवर साजरं केलं थाटामाटात केळवण

View this post on Instagram

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

काही महिन्यांपूर्वीसुद्धा ईशा मालिकेच्या काही भागांमध्ये दिसली नव्हती. तेव्हाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिनं सुट्टी घेतली होती. याबद्दल ती म्हणाली, “मध्यंतरी चिकन गुनिया आणि अन्नातून विषबाधा असं दोन्ही झालं असल्यामुळे मी काही दिवस रजेवर गेले होते. त्यावेळी मालिकेच्या टीमनं मला खूप सांभाळून घेतलं. आता डोळ्याच्या दुखापतीमुळे मी पुन्हा त्यांच्याकडे सुट्टी मागणं मला योग्य वाटत नव्हतं. अशानं मालिकेच्या कथेवरही परिणाम झाला असता. म्हणून मालिकेतून बाहेर पडायचं ठरवलं”.

आणखी वाचा – स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, होणारा नवरा दुसऱ्याच मुलीला करत होता डेट; रंगेहात पकडलं अन्…

याशिवाय तिने म्हटले की, “जीवतोड मेहनत करुन आपण पैसे कमावतो पण त्याचा उपभोगच घेता येत नसेल तर काय उपयोग? म्हणून थोडं थांबायचं ठरवलं. विश्रांतीनंतर मी पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे”.

Tags: isha keskarLakshmichya Pavalanimarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Kunickaa Sadanand on kumar sanu relation

"मी कोणाचेही घर फोडलेले नाही", कुमार सानूबरोबरच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत कुणिका सदानंद स्पष्टच बोलली, म्हणाली, "त्यांच्या वैवाहिक आयुष्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.