बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी ११, १२ तास काम करते”, कामाच्या तासांवरुन दीपिका पदुकोणचा वाद सुरु असतानाच जेनेलिया देशमुखची प्रतिक्रिया, म्हणाली, “अशक्य नाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 18, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh On Work-life balance

"मी ११, १२ तास काम करते", कामाच्या तासांवरुन दीपिका पदुकोणचा वाद सुरु असतानाच जेनेलिया देशमुखची प्रतिक्रिया, म्हणाली, "अशक्य नाही…"

Genelia Deshmukh On Work-life balance : अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘स्पिरिट’ हा चित्रपट सोडल्यापासून, मनोरंजन विश्वात शिफ्टच्या वेळा आणि कामाचे संतुलन याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. आई झाल्यानंतर दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याकडून आठ तास काम करणार असल्याची अट ठेवली होती. यावर दिग्दर्शक सहमत नसल्याने दीपिकाने हा चित्रपट सोडला. यानंतर, अनेक कलाकार दीपिकाच्या बचावासाठी पुढे आले. काहींना दीपिकाने घेतलेला हा निर्णय पटला तर काहींना तिचा हा निर्णय आवडला नाही. अशातच अलीकडेच अभिनेत्री जेनेलिया देशमुखला तिच्या कार्य प्रणालीबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विचारले गेले, तेव्हा ती म्हणाली की, ती दररोज १० तास काम करते. या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात जेनेलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अलीकडे ‘झूम’शी झालेल्या संभाषणात, जेनेलिया देशमुखने सांगितले की, ती आपले वैयक्तिक आयुष्य कसे सांभाळते?. अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा दिग्दर्शक कामाचे तास वाढवतात तेव्हा मी ऍडजेस्टमेंट करते. जेनेलिया म्हणाली, “हे अवघड आहे पण अशक्य नाही. मी दिवसातून १० तास काम करते आणि असे दिवस देखील येतात जेव्हा दिग्दर्शक ११ किंवा १२ तासांपर्यंत काम करण्यास सांगतात”.

आणखी वाचा – ९३ व्या वर्षी बायकोसाठी दागिना खरेदी करणारे आजोबा, सोनाराच्या दुकानात शिरताच…; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जेनेलिया पुढे म्हणाली, “मला वाटते की हे ठीक आहे, परंतु आम्हाला त्या ऍडजेस्टमेंटसाठी वेळ आवश्यक आहे. जेव्हा आपल्याकडे एक किंवा दोन दिवस असतात, तेव्हा आपल्याला अधिक काम करावे लागते. ही एक परस्पर समज आणि प्रक्रिया देखील आहे ज्याची प्रत्येक ठिकाणी काम करताना आवश्यकता आहे”. कामाच्या तासांविषयी जेनेलियाची कमेंट अशा वेळी आली जेव्हा दीपिकाला ‘स्पिरिट’ या चित्रपटातून सोडण्यात आले आणि कामाच्या वेळेवरुन त्यांच्यात वादविवाद झाला.

आणखी वाचा – मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका, प्रकृती गंभीर तरी डॉक्टरांकडे मागितले तीन तास, म्हणाला…

दीपिका पादुकोण संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ या चित्रपटात काम करणार होती. पण तिने आठ तास बदलण्याची अट ठेवली. तसेच, ४० कोटी रुपयांची मागणी केली. असेही म्हटले होते की, दिग्दर्शकाने त्याला तेलगू शिकण्यास सांगितले. या सर्व अटींवर, दीपिका आणि संदीप रेड्डी यांच्यात कोणताही करार झाला नाही, ज्यामुळे दीपिकाने हा चित्रपट सोडला. आता या चित्रपटात तृप्ति डिमरी मुख्य भूमिका बजावत आहे. दीपिका चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर सिनेविश्वात कामाच्या वेळेवरुन चर्चा सुरु झाली आहे.

Tags: bollywood newsdeepika padukonegenelia deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Marathi actress Bike Accident

दुचाकीवरुन अपघात, पायाला १८ टाके अन्…; कठीण प्रसंगातही मराठी अभिनेत्रीने केले सलग तीन प्रयोग, म्हणाली, "दुखापत असतानाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.