मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा ‘सिंहासनाधिश्वर’ रुपेरी पडद्यावर

सौरभ जाधवby सौरभ जाधव
जून 5, 2023 | 5:10 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sinhasanadhishwar Movie

Sinhasanadhishwar Movie

सध्या सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास यांवर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. काही चित्रपटांची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते तर काही चित्रपटांना प्रेक्षकांचा विरोध सुद्धा पाहायला मिळाला. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक या घटनेवर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे.(Sinhasanadhishwar Movie)

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, राज्याभिषेक करवून घेतला, अखंड हिंदुस्थानाला राजा मिळाला या प्रेरणादायी इतिहासामुळेच पुढे कित्येक वर्षे राजा नसतानाही रयतेने धैर्याने संकटाचा मुकाबला केला. आताच्या शतकातही कित्येकांच्या आयुष्यात उमेद निर्माण करणाऱ्या या सुवर्णक्षणाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथी प्रमाणे २ जून २०२३ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या दरबारात, राजसदरेवर शकील प्रॉडक्शन्स निर्मित ‘सिंहासनाधिश्वर’ या भव्य मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

सोबत चित्रपटाच्या दिमाखदार पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्माते श्री.शकील खान यांची निर्मिती असलेला आणि श्री.विजय राणे दिग्दर्शित करीत असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हा चित्रपट जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी श्री.नितीन पावले, कार्याध्यक्ष – शिवराज्याभिषेक सोहळा, श्री.सुनील पवार, अध्यक्ष – श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि पदाधिकारी उपस्थित होते.

(Sinhasanadhishwar Movie)

हिंदी चित्रपट, अनेक मालिका आणि शॉर्ट फिल्म्सच्या निर्मितीनंतर शकील खान यांनी ‘सिंहासनाधिश्वर’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘राजा शिवछत्रपती’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, अशा वेगवेगळ्या मालिका देव अवतारी बाळूमामा, पॉवर, रुदन यांसारखे चित्रपट आणि असंख्य इव्हेंटच्या माध्यमातून विजय राणे यांनी आपली दिग्दर्शकीय चुणूक दाखविली असून आगामी ‘सिंहासनाधिश्वर’ या भव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा रसिकांना पहायला मिळणार आहे.

Tags: सिंहासनाधिश्वरसिंहासनाधिश्वर चित्रपटchhtrapati shivaji maharajmarathi moviesinhasanadhishwarsinhasanadhishwar movie
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Gufi Paintal Death

'शकुनी मामा' म्हणून प्रसिद्ध असलेले गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.