रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्कुबा डायव्हिंगदरम्यान मार लागून मृत्यू आणि…; सुप्रसिद्ध गायकाच्या निधनानंतर मॅनेजरचे निवेदन समोर, म्हणाला, “स्थानिक लोकांमुळे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 20, 2025 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Zubeen Garg Death

स्कुबा डायव्हिंगदरम्यान मार लागून मृत्यू आणि…; सुप्रसिद्ध गायकाच्या निधनानंतर मॅनेजरचे निवेदन समोर, म्हणाला, "स्थानिक लोकांमुळे…"

Zubeen Garg Death : बॉलिवूड चित्रपट ‘गँगस्टर’मधील ‘या अली’ फेम गायक झुबीन गर्ग यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला. त्यांचे सिंगापूर येथे एका दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे समोर आले. स्कूबा डायव्हिंग दरम्यान झालेल्या अपघातामुळे त्यांचे अकाली निधन झाले. अशी बातमी आहे की जुबिन सिंगापूरला नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी जात असत, जिथे तो २० सप्टेंबर रोजी परफॉर्मन्स सादर करणार होता. त्याच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे त्याचे कुटुंब, प्रियजन तसेच आसाममधील लोक आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अशातच गायकाच्या इव्हेंट मॅनेजरचे पहिले अधिकृत निवेदन समोर आले आहे.

या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की, “आम्ही अत्यंत दुःखाने ही हृदयद्रावक बातमी शेअर करतो की आमचे प्रिय आयकॉन झुबीन गर्ग यांचे आज दुपारी २.३० वाजता सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये निधन झाले. झुबीन परवाच्या दिवशीच सिंगापूरला आले होते. उद्याच्या कार्यक्रमात ते आमच्यासोबत राहणार होते, लोकांना भेटणार होते आणि त्यांच्याशी संवाद साधणार होते. आज सकाळी, आमची संपूर्ण टीमची ईशान्य भारतातील गुंतवणूक सुलभ करण्यासाठी शांग्री-ला हॉटेलमध्ये सिंगापूरच्या वरिष्ठ उद्योगपती आणि धोरणकर्त्यांसोबत व्यावसायिक मीटिंग होती”.

आणखी वाचा – लग्नाआधीच गुडन्यूज?, भूषण प्रधान आणि केतकी नारायणच्या ‘त्या’ फोटोंची चर्चा, नेमकं प्रकरण काय?

टीमला या घटनेची माहिती कशी मिळाली याबाबत सांगताना मॅनेजरने स्पष्ट केले की, “मीटिंगदरम्यान, आम्हाला झुबीनच्या मॅनेजरचा फोन आला की त्याचा अपघात झाला आहे आणि त्याला सिंगापूरच्या जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. आम्हाला नंतर कळले की स्थानिक आसामी कम्युनिटीचे काही लोक त्याला यॉचवर घेऊन गेले होते, ज्याची आम्हाला पूर्व माहिती नव्हती”.

आणखी वाचा – ‘या अली’ फेम गायक जुबिन गर्गचे धक्कादायक निधन, स्कुबा डायव्हिंगदरम्यान मार लागला आणि…

झुबीन गर्ग यांच्या अचानक निधनाने सिनेक्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. झुबीनने ‘चंदा’ (1996), ‘जलवा’ (1998), ‘यही कभी’ (1998), ‘जादू’ (1999), ‘स्पर्श’ (2000), या चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. त्याने ‘गद्दार’ (1995), ‘दिल से’ (1998), ‘डोली सजा के रखना’ (1998), ‘फिजा’ (2000), ‘कांटे’ (2002) या चित्रपटातील गाणीही केली.

Tags: bollywood singerZubeen Garg DeathZubeen Garg Died in Scuba Diving Accident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
priya marathe death

"जवळच्या व्यक्तीला वेळ देणं…", प्रिया मराठेच्या निधनानंतर पतीची पहिली प्रतिक्रिया, शंतनू मोघे म्हणाला, " सुख-दुःख खुंटीला टांगून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.