शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जवळच्या व्यक्तीला वेळ देणं…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर पतीची पहिली प्रतिक्रिया, शंतनू मोघे म्हणाला, ” सुख-दुःख खुंटीला टांगून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 20, 2025 | 11:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
priya marathe death

"जवळच्या व्यक्तीला वेळ देणं…", प्रिया मराठेच्या निधनानंतर पतीची पहिली प्रतिक्रिया, शंतनू मोघे म्हणाला, " सुख-दुःख खुंटीला टांगून…"

priya marathe death : सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले. अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. अभिनेत्रीची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठे यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सुस्वभावी, निरागस, मृदुभाषी अशी प्रियाची ओळख होती. आजवर प्रियाने केलेल्या अभिनयाला प्रत्येक चाहत्याने, प्रेक्षकांनी दाद दिली आहे. मात्र प्रियाचं हे असं अचानक जाण्याने अनेकांना भावुक केलं. प्रिया गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती यावेळी तिचा पती अभिनेता शंतनू मोघेने तिची साथ दिली. या काही पिरेडसाठी शंतनूने काम बाजूला ठेवून पत्नीला वेळ दिला. प्रियाच्या निधनानंतर आता शंतनू सावरताना दिसला आणि त्याने पुन्हा एकदा मालिकेद्वारे कमबॅक केलं.

‘शो मस्ट गो ऑन’ हे वाक्य प्रत्येक कलाकाराच्या तोंडून येतं. असंच म्हणणं आता शंतनू मोघेचं ही आहे. तब्बल १५ महिन्यानंतर शंतनूने ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून शंतनू मालिकाविश्वात परतला आहे. त्याच्या मालिकेतील सीनचा टिझर पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. १५ महिन्यांनंतर मालिकेत परतल्यानंतर शंतनूने हा मधला प्रवास कसा होता आणि त्याच्या या भूमिकेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ला प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – स्कुबा डायव्हिंगदरम्यान मार लागून मृत्यू आणि…; सुप्रसिद्ध गायकाच्या निधनानंतर मॅनेजरचे निवेदन समोर, म्हणाला, “स्थानिक लोकांमुळे…”

View this post on Instagram

A post shared by Shantanu S. Moghe (@shantanusmoghe)

शंतनू म्हणाला, “मध्यंतरीच्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं, म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही. आयुष्यात आलेलं ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे नेहमी सांगायचे, आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दुःख खुंटीला टांगून त्या-त्या व्यक्तिरेखेची सुख-दुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो”.

आणखी वाचा – ‘या अली’ फेम गायक जुबिन गर्गचे धक्कादायक निधन, स्कुबा डायव्हिंगदरम्यान मार लागला आणि…

पुढे त्याने असं म्हटलं, “कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो. काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे. आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, हीच आमची खरी ताकद आहे”. मालिकेतल्या भूमिकेविषयी तो म्हणाला, “मी मालिकेत साकारत असलेली शंतनु ही भूमिका आता नकारात्मक वाटत असली तरी तशी नाहीय. विविध भावभावनांच्या छटा पाहायला मिळतील. या मालिकेच्या निमित्तानं मी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी, सतीश राजवाडे आणि सोल प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचा ऋणी आहे, त्यांनी मला समजून घेतलं”.

Tags: marathi actorpriya marathe deathShantanu moghe
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Zubeen Garg Last Video 

दुकानं बंद केली, चाहते रस्त्यावरच रडू लागले आणि…; गायक झुबीन गर्गच्या निधनाने आसाम कोलमडलं, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.