‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या चलती आहे,चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आज एक महिन्यात चित्रपटाने ६५ कोटींहून अधिक कमाई करत अफलातून यश संपादन केलं आहे. उत्तम कथा, दिग्दर्शन, सुपर उत्साही अभिनेत्रीचा सहज सुंदर अभिनय यांच्या सोबतच लक्ष वेधून घेतात ती म्हणजे चित्रपटातील गाणी, चित्रपटगृहात प्रेक्षकांना देखील या गाण्यांवर थिरकण्याचा मोह आवरला नाही.चित्रपटातील शेवटचं त्या मंगळागौरीच्या गाण्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. (savaniee ravindrra national award)
या सर्व गाण्यांच्या मागचा तो सुरेल आवाज असणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका म्हणजे सावनी रवींद्र.सावनीने तिच्या मधुर आवाजाने कायमचं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सध्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाण्यांसाठी देखील सावनीचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे.सावनीला २०२१ साली सर्वत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.सावनीला शार्वी नावाची एक गोंडस मुलगी आहे.
पाहा काय म्हणाली सावनी? (savaniee ravindrra national award)
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या निमित्ताने एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीत सावनीने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतानाचा एक अनुभव सांगितला. सावनी म्हणाली,ती जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेली होती, तेव्हा सावनीची मुलगी फक्त २ महिन्यांची होते. तेव्हा ती फक्त आईच्या दुधावर होती, आणि पुरस्कार सोहळ्यासाठी सावनीला ५ तास बाहेर रहावं लागणार होतं.सावनीचं मन तयार होतं नव्हतं, खूप हिंमतीने ती पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेली. एका बाजूला खूप मोठा आनंद होता, तर सतत २ महिन्यांचं आपलं बाळ डोळ्या समोर येत होतं.सावनी जेव्हा पुरस्कार स्वीकारत होती तेव्हा तिच्या आई-बाबांनी, सावनीच्या २ महिन्याच्या लेकीला आईला पुरस्कार घेताना टीव्ही वर दाखवलं होतं.(savaniee ravindrra daughter)
पुरस्कारानंतर मुलाखत देण्यासाठी थांबायचं होतं, सावनीच्या मनाची घालमेल होतं होती, आपलं तान्ह बाळ तिकडे उपाशी असेल, रडत असेल.तेव्हा सावनीला तिच्या नवऱ्याने आशिषने आधार दिला.या सगळ्यात ५ तासाच्या वर होऊन गेले होते, शार्वी उपाशी होती, पंरतु त्या दोन महिन्याच्या बाळाने आपल्या आईला खऱ्या अर्थाने ताकत दिली. तो तेवढा वेळ शार्वी रडली देखील आहे.त्यांनतर हॉटेल मध्ये गेल्यावर सावनीने जेव्हा शार्वीला जवळ घेतलं तो क्षण सावनी कधीच विसरू शकत नाही असं ती सांगते. आणि म्हणूनच आईपणमुळे बाईपण नक्कीच भारी आहे.
हे देखील वाचा : ‘बाईपण’ इतकं यश ‘महाराष्ट्र शाहीर’ला मिळालं नाही?केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत