बिग बी म्हणून बी टाऊनमध्ये ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अभिनेता म्हणून अमिताभ यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेम करत असेल तरी बरेचदा काही नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोलिंगचा सामना ही करावा लागतोय. अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विट करून म्हणा वा एखादी फेसबुक पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच तब्बल १३ वर्षांपूर्वी अमिताभ यांनी केलेलं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आहे.(Amitabh Bachchan Tweet Viral)
बिग बींनी हे ट्वीट १३ वर्षांपूर्वी म्हणजेच १२ जून २०१० रोजी केलं होतं. “इंग्रजी भाषेत ‘ब्रा’ एकवचनी आणि ‘पँटीज’ अनेकवचनी का आहे,” असं अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्वीट होतं. हे ट्वीट पुन्हा एकदा व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करून प्रश्नांचा भडीमार सुरु केला आहे. “हा प्रश्न केबीसीमध्ये ५ कोटी रुपयांसाठी विचारा सर,” असं एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने “ही शंका आज दूर व्हायलाच हवी,” असं म्हणत कमेंट केली आहे.
पाहा नेटकऱ्यांनी अमिताभ यांना का केलं ट्रोल (Amitabh Bachchan Tweet Viral)
“चांगला प्रश्न आहे बच्चनसाहेब, KBC च्या पुढच्या सिझनमध्ये हा प्रश्न नक्की विचारा,” असं म्हणत देखील एका युजरने अमिताभ बच्चन यांना डिवचलं आहे. तर आणखी एका युजरने ट्विट करत “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” असं म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘उंचाई’, ‘गुडबाय’ या चित्रपटातून अमिताभ यांनी महत्वपूर्ण साकारली आहे. लवकरच ते टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’, तसेच प्रभास आणि दीपिकासोबतचा ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत.