गायक राहुल वैद्यने आजवर त्याच्या गायनाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. इंडियन आयडल या रिऍलिटी शोमधून तसेच अनेक कार्यक्रमांदरम्यानच्या गाण्यांनी राहुलने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. राहुलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती म्हणजे ‘बिग बॉस’हिंदी या रिऍलिटी शोमधून. ‘बिग बॉस’मुळे राहुल घराघरांत पोहोचला. सोशल मीडियावरही राहुल बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावरुनही तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Rahul Vaidya Video)
गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार मनोरंजनसृष्टीतले गोड कपल मानले जातात. ‘बिग बॉस’च्या घरात तयार झालेल्या या जोडीने लग्नसोहळा उरकला. त्यानंतर दोघेही आई वडील झाल्याच्या गोड बातमीमुळे चर्चेत आले. राहुल नेहमीच सोशल मीडियावरुन हटके व्हिडीओ, रील्स तसेच त्याच्या लेकीबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. बरेचदा तो त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत आलेला पाहायला मिळाला आहे.
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असणाऱ्या राहुलने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुलने एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत राहुलने केलेला अभिनय सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या खुर्चीवर राहुल बसत त्यांचा अभिनय करताना दिसला. एकनाथ शिंदेंसारखं तो हात दाखवताना दिसत आहेत. राहुलने हा व्हिडीओ “किस्सा कुर्सी का”, असं म्हणत शेअर केला आहे.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून किती कमावते बबिता?, मुनमुन दत्ताचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…
राहुल व दिशाने १६ जुलै २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. ‘बिग बॉस १४’च्या घरात असतानाच राहूलने दिशाला प्रपोज केलं होतं. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरुन तिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.