‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचली जोडी म्हणजे गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. प्रथमेश व मुग्धा यांनी आजवर त्यांच्या गायनाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही जोडी नेहमीच त्यांच्या गायनकलेने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन सोडते. प्रथमेश व मुग्धा यांनी एकत्र मिळून आजवर अनेक गायचे कार्यक्रम केले आहेत. प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीने ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यावेळी साऱ्या प्रेक्षकवर्गाला आश्चर्याचा धक्का बसला. (Prathamesh Laghate Story)
मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. याशिवाय दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांचेही अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नापासून ही जोडी विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळाली. तसेच सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच सक्रिय असते. रोजचे अपडेट ही जोडी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसह शेअर करत असते. अशातच प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या सासू-सासऱ्यांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. आज मुग्धाच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्या लाडक्या जावयाने, “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासू माँ, सासरे बुवा”, असं कॅप्शन देत त्याने दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा फॅमिली फोटो एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत. अत्यंत साधी राहणी असलेल्या या कुटुंबाचं करावं तितकं कौतुक कमीच.
जगभरात मुग्धा व प्रथमेश या जोडीचे लाखो चाहते दिवाने आहेत. मुग्धा व प्रथमेश यांचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही चाहते आहेत. बरेचदा ही जोडी चाहत्यांच्या प्रेमासाठी परदेश दौरे करताना दिसते. शिवाय बरेचदा ही जोडी कोकणदौरा करतानाही दिसते. कोकणात प्रथमेशच घर असल्याने ते बरेचदा कोकणात रमलेले पाहायला मिळाले आहेत. नुकताच दोघांचा कोकणदौरा झाल्यानंतर ते मुग्धाच्या घरी अलिबागलाही पोहोचले होते.