Neha Kakkar Melbourne Concert : बॉलिवूड आणि पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नुकतीच एका मैफिलीनंतर चर्चेत आली आहे. खरं तर, नेहा कक्कर हिने ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नमध्ये मैफिल केली होती, ज्यामध्ये ती तीन तास उशिराने कॉन्सर्टमध्ये पोहोचली. यावेळी गायिकेच्या उशिरा येण्याने लोकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. नेहावर उपस्थित सगळेच प्रेक्षक भडकले होते. स्वतःच्या कॉन्सर्टला तीन तास उशिरा येणं हे चूक आहे असं अनेकांनी म्हणत गायिकेला अर्ध्यावरच ही कॉन्सर्ट सोडून जाण्यास सांगितलं. यावेळी थेट मैफिलीत नेहाने रडण्यास सुरवात केली आणि प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली. अहवालानुसार, तिने मैफिलीत एक तास सादरीकरण केले. मेलबर्नमध्ये या घटनेनंतर नेहा कक्करला खूप ट्रोल केले जात होते, आता ट्रोलिंगनंतर, नेहाने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
गायक नेहा कक्कर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, “तिने सांगितले की ती ३ तास उशिरा आली, त्यांनी एकदाही विचारले का की तिचे काय झाले किंवा तिच्या बँडचे काय केले?. जेव्हा मी स्टेजवर पोचले तेव्हा मी कोणालाही आमच्याबरोबर काय झाले ते सांगितले नाही कारण मला कोणालाही इजा होऊ नये असे वाटत होते. तुम्हाला माहिती आहे का की मी माझ्या मेलबर्न प्रेक्षकांसाठी अगदी मोफत सादरीकरण केले? आयोजक माझे आणि इतरांचे पैसे घेऊन पळून गेले. माझ्या बँडला जेवण, हॉटेल आणि पाणीही दिले गेले नाही. माझे पती आणि त्यांच्या टीमने जाऊन त्यांना जेवण पुरवले. हे सर्व असूनही आम्ही स्टेजवर गेलो आणि विश्रांती किंवा काहीही न करता कार्यक्रम केला कारण माझे चाहते तासंतास माझी वाट पाहत होते”.
पुढे ती म्हणाली, “तुम्हाला माहिती आहे का आमच्या ध्वनी तपासणीला तासंतास उशीर झाला कारण ध्वनी विक्रेत्याला पैसे दिले गेले नव्हते आणि त्याने ध्वनी लावण्यास नकार दिला. आणि जेव्हा इतक्या विलंबानंतर आमची ध्वनी तपासणी सुरु झाली. आम्हाला हे देखील माहित नव्हते की कॉन्सर्ट सुरु आहे की नाही कारण आयोजकांनी माझ्या व्यवस्थापकाचे फोन उचलणे बंद केले होते कारण ते प्रायोजकांपासून आणि सर्वांपासून पळून जात होते. अजूनही शेअर करण्यासाठी बरेच काही आहे पण मला वाटते की हे पुरेसे आहे. आणखी वाचा – ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात झळकणार ‘हे’ चेहरे, बालपणीच्या आठवणींना मिळणार उजाळा, प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकतामाझ्याबद्दल इतक्या सुंदर बोलणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. माझी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या सर्व प्रयत्नांचे मी खरोखर कौतुक करते. त्या दिवशी माझ्या संगीत कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि माझ्याबरोबर रडलेल्या आणि मनापासून नाचणाऱ्या सर्वांची मी नेहमीच आभारी राहीन. माझ्या नेहार्ट्सचे आणि मला पाठिंबा देणाऱ्या आणि फक्त प्रेम देणाऱ्या प्रत्येकाचे मी पुरेसे आभार मानू शकत नाही. धन्यवाद”.
नेहा कक्कर मेलबर्न कॉन्सर्टमध्ये उशिराने पोचल्याने साऱ्यांनी राग व्यक्त केला. यावेळी अभिनेत्रीला रडू आवरेना झालं. दरम्यान, काही संतप्त चाहत्यांनी गायिकेच्या रडण्याला अभिनय म्हटलं, तर काहींनी तिचे अश्रू बनावट असल्याचे म्हटले. नेहा कक्कर ही गायक टोनी कक्कर आणि सोनू कक्कर यांची लहान बहीण आहे. ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे आणि तिनं इंडियन आयडलसह अनेक म्युझिक शोमध्ये जज म्हणून काम केलं आहे.