बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मंगलाष्टका सुरु असताना मुग्धा वैशंपायनला मंडपातच कोसळलं रडू, कॅमेऱ्यामध्ये ते क्षण टिपले अन्…; सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 27, 2023 | 1:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding

Mugdha Vaishampayan Emotional

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding : प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या आयुष्याचा प्रवास आता नवीन वळणावर आला आहे. त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे. मैत्री, प्रेम व त्यानंतर लग्न असा हा त्यांचा प्रवास त्यांनी पार पाडला आहे. अखेर मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकले आहेत. मित्र परिवार व जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मुग्धा -प्रथमेश यांचा विवाहसोहळा चिपळून येथे पार पडला आहे. अगदी पारंपरिक अंदाजात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

२१ डिसेंबररोजी मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर मुग्धा-प्रथमेशच्या विवाहसोहळ्यातील फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला. अनेक कलाकारांनी देखील दोघांना सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. मुग्धाने आमचं झालंय असं कॅप्शन देत लग्नातील खास क्षण शेअर केले होते.

आणखी वाचा – रुबिना दिलैकने पहिल्यांदाच दाखवला जुळ्या मुलींचा चेहरा, लेकींची नावही आहेत फारच खास, घरात पूजाही केली अन्…

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

मुग्धा-प्रथमेशच्या लग्नातील एक भावुक करणारा फोटो समोर आला आहे. मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो रिपोस्ट केला आहे. मंगलाष्टकांच्यावेळी मुग्धाच्या डोळ्यात पाणी आलेलं या फोटोत पाहायला मिळालं. नव्या आयुष्याला सुरुवात करण्याआधी मुग्धाच्या डोळ्यातील हे अश्रू बरंच काही सांगताना दिसले. मुग्धा व प्रथमेशच्या लग्नात दोघांनी धमाल, मस्ती केल्याचंही पाहायला मिळालं. लग्नातील दोघांच्या लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

आणखी वाचा – आधी स्पष्ट नकार, त्यानंतर मैत्री अन्…; गौतमी देशपांडे व स्वानंदच्या लव्हस्टोरीला अशी झाली सुरुवात, म्हणाली, “मला तो जास्त…”

प्रथमेश-मुग्धाच्या पारंपरिक पद्धतीने साजरा केलेल्या लग्नसोहळ्याबरोबरच या दोघांची हळदही चर्चेत राहिली. अत्यंत साधेपणाने व घरच्या घरी उरकल्या हळदीच्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली. दोघांनी पारंपरिक थाटात हळदीचा समारंभ साजरा केल्याने प्रेक्षकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नात कलाक्षेत्रातील कलाकार मंडळींची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.

Tags: entertainmentmugdha vaishampayanMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Weddingmugdha vaishampayan emotional
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
bollywood actor aamir khan daughter ira khan and nupur shikhare pre wedding function started kiran rao spotted

मोदक, लाडू, पंगत अन्…; आमिर खानच्या लेकीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, महाराष्ट्रीयन पद्धतीने थाट, पूर्वाश्रमीच्या पत्नीची हजेरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.