सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिंपल लुक, ना अवाढव्य खर्च; मेघन आणि अनुष्काच्या लग्नाच्या लुकमधील साधेपणाची चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 17, 2025 | 5:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Meghan Jadhav-Anushka Pimputkar Wedding

सिंपल लुक, ना अवाढव्य खर्च; मेघन आणि अनुष्काच्या लग्नाच्या लुकमधील साधेपणाची चर्चा

Meghan Jadhav-Anushka Pimputkar Wedding: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा अभिनेता मेघन जाधव कायमच चर्चेत असतो. मात्र सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. मेघन जाधव अनुष्का पिंपुटकरसह लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि या चर्चा सत्यात उतरल्या. त्यानंतर मेघनने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचं सांगितलं. अशातच नुकताच मेघन जाधव १६ नोव्हेंबर रोजी अनुष्का पिंपुटकरसह लग्नबंधनात अडकला. अनेक मराठी कलाकारांची या लग्न सोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळाली.

आणखी वाचा : राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना कन्यारत्न, लग्नाच्या वाढदिवशीच झाले आई-बाबा, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

सध्या सोशल मीडियावर मेघन-अनुष्काच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. याचबरोबर अवाढव्य खर्च न करता त्यांच्या सध्या लग्न सोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच त्यांचा लग्नातील लूकमध्ये ही साधेपणा दिसून आला. मेघनने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली असून त्यावर लाल रंगाचा शेला घेतला होता तर अनुष्काने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. लग्न सोहळ्यसाठी कोणताही अवाढव्य खर्च न करता त्यांच्या साधेपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर अनेक चाहत्यांनी मेघन आणि अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

आणखी वाचा : “तुम्हाला लाज नाही वाटत xxxx”, घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींवर सनी देओल भडकला, म्हणाला, “तुमच्या घरी आई-वडील…https://marathi.itsmajja.com/sunny-deol-angry-on-paparazzi-media-after-sensitive-video-of-dharmendra-from-his-home-goes-viral/

मेघन आणि अनुष्का गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तर दोघांची भेट ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यादरम्यान दोघांची छान मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या ही कामाबद्दल बोलायच झाल्यास, मेधन जाधव सध्या ‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेत जयंत’ची भूमिका साकारत आहे. तर अनुष्का पिंपुटकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करत आहे.

Tags: anushka pimputkarmeghan jadhavwedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Next Post
Nashik Malegaon Rape case

"ही राक्षसी प्रवृत्ती…", नाशिक मालेगांव अत्याचार आणि हत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "महाराजांच्या भूमीत राहतो आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.