शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हटके इंटिरिअर, स्वादिष्ट जेवण अन्…; शाहरुख खानच्या बायकोने मुंबईत सुरु केलं स्वत:चं आलिशान हॉटेल, सगळं काही आहे खास

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 14, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Gauri khan first opened her restaurant tori in Mumbai bandra photos shared on social media

हटके इंटिरिअर, स्वादिष्ट जेवण अन्...; शाहरुख खानच्या बायकोने मुंबईत सुरु केलं स्वत:चं आलिशान हॉटेल, सगळं काही आहे खास

कलाविश्वातील अनेक मंडळी स्वत:चा वेगळा व्यवसाय उभारत आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशातच आता यात आणखी एकाची भर पडली आहे आणि  ती म्हणजे गौरी खान. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानचे इंडस्ट्रीत वेगळे स्थान आहे. सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी असूनही गौरीने स्वतःची एक वेगळी ओळख कायम ठेवली आहे.

गौरी खान ही एक यशस्वी निर्माती असण्याबरोबरच एक इंटिरियर डिझायनर आहे. तिची स्वत:ची कंपनीदेखील आहे. आजवर अनेक कलाकारांची घरे सजवणाऱ्या गौरीने आता तिचा आणखी एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. गौरीने तिचे नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. गौरीने तिच्या या नवीन रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

आणखी वाचा – ना वाद, ना मतभेद, तरीही घटस्फोट अन्…; आमिर खानबरोबरच्या नात्यावर किरण रावचं भाष्य, म्हणाली, “एक कुटुंब म्हणून…”

गौरीने तिच्या या नवीन रेस्टॉरंटचे नाव ‘तोरी’ असं ठेवलं आहे. हे रेस्टॉरंट मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल भागात आहे. गौरीने नुकतीच तिच्या सोशल मीडियाद्वारे ‘टोरी’ या रेस्टॉरंटची खास झलक दाखवली आहे. हे खास फोटो शेअर करत गौरीने “माझे पहिले रेस्टॉरंट ‘टोरी’ तुमच्यासाठी मुंबईत उघडले आहे” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – आदित्य नारायणच्या ‘त्या’ कृतीमागील सत्य आलं समोर, मॅनेजरने खुलासा करत म्हटलं “सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण…”

गौरी खान एक चित्रपट निर्माती आणि एक उत्कृष्ट इंटिरिअर डिझायनर आहे. २००२मध्ये तिने पती शाहरुख खानबरोबर ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. तसेच इंटिरिअर डिझायनर म्हणून गौरीने मुकेश अंबानी, करण जोहर, आलिया भट्ट व राल्फ लॉरेन यांसारख्या अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या घरांची इंटिरिअरचे कामे केली आहेत.

Tags: Bollywood entertainment newsbollywood newsentertainment newsgauri khanmumbainew hotelTori Hotelगौरी खानटोरी हॉटेलनवीन हॉटेलबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीमुंबई
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Rakul Preet Singh Jackky Bhagnani Wedding

आली लग्नघटिका समीप! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी गोव्यातील 'या' आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, जय्यत तयारी सुरु

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.