सिनेविश्वात आपल्या अंगी असलेल्या कलेने साऱ्या रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अनेक नामवंत कलाकारांचे करावे तितके कौतुक कमीच. आजवर बऱ्याच कलाकारांना सन्मानित करून गौरविण्यात आले. मात्र सोशल मीडियावर एका व्हिडीओने सध्या धुमाकूळ घातलाय. आणि तो व्हिडीओ पाहताच क्षणी डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही. अशा या नेत्र दिपवणाऱ्या व्हिडीओने साऱ्यांनाच झुकवलंय. (ashok saraf siddharth jadhav)
अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर झी चित्र गौरवाची यंदाची एक व्हिडीओ शेअर केली आहे. यांत सुप्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना मानवंदना देण्यात आलेली पाहायला मिळतेय. या झी चित्र गौरवला संपूर्ण जगाची क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने ही हजेरी लावली होती त्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर वारसारखे पसरले होते मात्र अशोक सराफ यांच्या या एका व्हिडीओने अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले.
पहा सिद्दार्थने अशोक सराफ यांना कशी दिली मानवंदना (ashok saraf siddharth jadhav)

यंदाच्या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे मानकरी ठरले दिग्गज सिनेअभिनेते आणि आपल्या सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ. चित्रपट, मालिका, नाटक यांतून आपल्या अभिनयाची छाप त्यांनी कायम सोडली. आणि कायमच साऱ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यंदाच्या झी चित्र गौरव या सोहळयाला अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडवला. त्यांना सिद्धार्थने एका वेगळ्या अंदाजात दिलेली ही मानवंदना वाखाणण्याजोगी आहे. या खास स्पेशल क्षणाचा एक टीझर झी मराठी आणि सिद्धार्थ जाधवने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करून सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये असे पाहायला मिळत आहे की, सिद्धार्थने अश्विनी ये ना या गाण्यावर नृत्य सादर केलं त्यानंतर सिद्धार्थ जाधवने अशोक मामांना दिलेली मानवंदना पाहणं थक्क करणार होत.

नृत्य सादर केल्यावर सिद्धार्थ भावूक होऊन मंचावरुन खाली उतरला. आणि हातातील फुलांचा हार अशोक सराफ यांना घातला अन् तिथेच त्याने अशोक सराफ यांना साष्टांग दंडवत देखील घातला. हे सर पाहून अशोक मामांनाही अश्रू अनावर झाले, त्यांनी देखील हात जोडून सिद्धार्थने दिलेली मानवंदना स्वीकारली. दरम्यान या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांनीही सिद्धार्थचे टाळ्यांच्या स्वरूपात कौतुक केले. सिद्धार्थची ही कृती पाहून अलका कुबल, महेश कोठारे, जयवंत वाडकर, सचिन पिळगांवकर, मृणाल कुलकर्णी यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. (ashok saraf siddharth jadhav)
====
हे देखील वाचा – अखेर अक्षयाच्या त्या फोटोमागील गुपित उलगडलं..
====
त्यानंतर सिद्धार्थने अशोक सराफ यांचा हात धरून सोबत सचिन पिळगांवकर यांनाही मंचावर घेऊन आला. सोबत महेश कोठारेही मंचावर येताना दिसत आहेत. मंचावर येताच अशोक सराफ यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे हात जोडून आभार मानले. आणि आभार व्यक्त करत अशोक सराफ भावुक होत म्हणाले, खार तर मी पुन्हा निरुत्तर झालो, तुमचं हे असं प्रेम पाहिलं ना की असं वाटत की, दरवेळेला आपण नट म्हणूनच जन्माला यावं. त्यांच्या या वाक्याने तर साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू आलं. आणि सोहळ्याला उपस्थित प्रत्येकाने अशोक मामांना उभं राहून ही मानवंदना दिली.