शीतल क्षीरसागर ही मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये अभिनय साकारून आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली. पण खरी ओळख तिला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने सिम्मी काकूंची ही भूमिका साकारली होती. शीतल कलाविश्वासोबतच सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असलेली पाहायला मिळते.तर अश्यातच तिने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे.(Sheetal Kshirsagar)
शीतलची गुढीपाडवाच्या दिवशी स्वप्नपूर्ती झाली आहे ही गुडन्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली. तिने नवी कोरी गाडी खरेदी केली. याचा व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला. यात ती तिची गाडी दाखवताना खूप आनंदी असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, तुमची स्वप्नं नक्की पूर्ण होतात.आई वडिलांच्या आशिर्वादाने, कुटुंबाच्या प्रेमामुळे आणि सद्गुरू बाबाजी महाराजांच्या कृपेने माझ्या बकेट लिस्टमधलं एक स्वप्न पूर्ण झालं.Hyundai Venue ही गाडी घरी आली.गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही आनंदाची बातमी तुम्हांला सांगताना खूप आनंद होतोय.गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आणि येणारं प्रत्येक वर्ष तुमच्या शुभ,मंगल इच्छा पूर्ण करणारं जावो.तुम्हांला सुख, समाधान ,सौख्य, ऐश्वर्य ,भरभराट, मनःशांती आणि आरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो हीच सद्गुरूं चरणी प्रार्थना..या मध्ये तिने स्वतःच्या भावना मांडल्या आहेत. तर तिने हुंडाई कंपनीची गाडी खरेदी केली. तर तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला.(Sheetal Kshirsagar)
====
हे देखील वाचा –हॅशटॅगमुळे प्रियदर्शनी-ओंकरच्या फोटोची रंगली चर्चा
====
शीतल क्षीरसागर ही गेली २० वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यकर्त आहे.तिने त्यांच्या वाटेल आलेल्या प्रत्येक भूमिका चोख पद्धतीने साकारत भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिला. का रे दुरावा, एक होती राजकन्या , आई कुठे काय करते, माझी तुझी रेशीमगाठ अश्या अनेक मालिकेतून अभिनयाची जादू दाखवली. पण तिची .सिम्मी काकूंची भूमिका प्रचंड गाजली असून चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरली. तसेच तीने एक होती वादी या चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारली आहे.