सध्या कलाकार मंडळी हे परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत. अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर ही तिच्या कुटुंबासोबत परदेश दौरा करतेय, तर सोनाली कुलकर्णी वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्यासोबत टर्कीला एन्जॉय करतेय, शिवाय लोकप्रिय जोड्यांपैकी एक आणि क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ आणि मिताली हे देखील पॅरिस दौरा करण्यात व्यस्त आहेत.अशातच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी पॅरिसला जाऊन वेगवेगळ्या जागांचे अपडेट सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(Siddharth Mitali Photoshoot)
त्यात सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती सिद्धार्थ मितालीच्या पॅरिस येथे केलेल्या नव्या फोटोशूटची. सिद्धार्थ मितालीने आयफेल टॉवर समोर उभं राहून केलेलं फोटोशूट पाहणं अधिक रंजक ठरतंय. आयफेल टॉवर जवळ उभं राहून फोटो काढण्याची अनेकांची इच्छा असते. आणि अशातच सिद्धार्थ व मितालीलाही पॅरिसल्या गेल्यानंतर आयफेल टॉवरसमोर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मितालीने वेस्टर्न ड्रेस तर सिद्धार्थने ब्लेजर घालून हे खास फोटोशूट केलंय.
पहा सिद्धार्थ मितालीचा रोमँटिक अंदाज (Siddharth Mitali Photoshoot)
अगदी रोमँटिक अंदाजात खालेल्या या फोटोशूटचे फोटोज सिद्धार्थ आणि मिताली यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंची सोशल मीडियावर हवा सुरु आहे. या मराठमोळ्या जोडीने थेट पॅरिस येथील आयफेल टॉवर जवळ लिपलॉक करतानाचा फोटो शेअर केला.

त्यांच्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट केल्या आहेत. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, गायत्री दातार यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या फोटोंना पसंती दर्शवली.(Siddharth Mitali Photoshoot)
हे देखील वाचा – संकेत-सुपर्णाची मजेशीर वटपौर्णिमा
सिद्धार्थ व मिताली त्यांच्या कामामध्ये कितीही व्यस्त असले तरी एकमेकांना अधिक वेळ देताना ते नेहमीच दिसतात. कामांमधून वेळ काढत ही जोडी भटकंती करत मनसोक्त एन्जॉय करताना पाहायला मिळते. आताही या दोघांनी पॅरिसमध्ये भटकंती करतानाचे अनेक व्हिडीओज फोटोज सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. पॅरिस मध्ये त्यांनी डिझनी लँडला सुद्धा भेट दिली होती. त्यांनी डिझनी लँडचे अनेक फोटो व्हिडीओज शेअर केले होते. या सगळ्यामध्ये त्यांनी पॅरिसमध्ये जाऊन केलेल्या खास कपल फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय.
