मराठी तसेच हिंदी चित्रपटातून नावारूपाला आलेला अभिनेता श्रेयस तळपदे आपल्याला “माझी तुझी रेशीम गाठ” या मालिकेत दिसला होता. या व्यतिरिक्त श्रेयसला होस्टिंग ची आवड असून तो नुकताच आपल्याला “झी चित्र गौरव पुरस्काराचे” होस्टिंग करताना दिसला. श्रेयसने काही दिवसांपूर्वी एका हिंदी यु ट्यूब चॅनल ला एक इंटरव्युव्ह दिला असून, श्रेयसला त्याच्या करियर मधला पहिला हिंदी सिनेमा “इकबाल” कसा मिळाला या बद्दलचा एक किस्सा त्याने शेअर केला आहे.(Struggle Story Shreyas Talpade)

आभाळमाया ही श्रेयसच्या करियर मधील पहिली मराठी मालिका होती. या मालिकेमुळेच श्रेयसला खरी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर श्रेयसला काम मिळायला सुरुवात झाली. तो एका वेळी ४ ते ५ मालिका करत असे, तो सगळ्याच शो मध्ये दिसत असल्यामुळे त्याला आभाळमाया ही मालिका सोडावी लागली. त्यामुळे हातात काम नसताना शेयसला ऑडिशन देण्याची वेळ आली होती. इक्बाल सिनेमा मिळायच्या आधी तो एका शोच्या ऑडिशनला गेला होता. परंतु त्या ऑडिशनवेळी श्रेयसचा इंट्रो झाल्यानंतर, कॅमेरामॅन टेक घेणार तितक्यात कॅमेराच बंद झाला.
हे देखील वाचा- ‘मिसेस गोस्वामीं’ ची छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री सचिन गोस्वामीं पाठोपाठ ‘या’ मालिकेत झळकणार
श्रेयस तिथून निघून गेला असता पुन्हा कॅमेरा सुरु झाल्यामुळे, त्याला पुन्हा ऑडिशनसाठी बोलवण्यात आले. श्रेयसच्या आधी २ जणांचे ऑडिशन झाले होते, परंतु नेमका श्रेयस आल्यावरच कॅमेरा बंद पडत असे. इतकं झालं की ऑडिशन घेणारा श्रेयसला तू पनवती आहेस म्हणाला. पुढे श्रेयस ने सांगितले हा नियतीने घडवून आणला असावा कारण माझ्या नशिबात इक्बाल सिनेमा लिहिला होता.(Struggle Story Shreyas Talpade)

अभिनयाला ठोकणार होता राम राम…(Struggle Story Shreyas Talpade)
इक्बाल सिनेमा मिळण्याआधी शेयसच्या आयुष्यात खूप चढउतार सुरु होते. त्यामुळे त्याच अभिनयावरून मन उडालं. याच दरम्यान श्रेयसच लग्न देखील ठरलं. यामुळे त्यावर जबाबदारी वाढणार होती. मी दुसरं कोणतंही काम करेन पण अभिनय करायचा नाही असं त्याने ठरवलं. परंतु इक्बाल हा सिनेमा खरंच श्रेयसच्या नशिबात लिहिला असल्याने त्याच मन परिवर्तित झालं असावं आणि त्याने अभिनयाला पुन्हा आपलंस केलं. त्याच्या या निर्णयामुळे इक्बाल सिनेमा श्रेयसच्या करियरमधला गेम चेंजर सिनेमा ठरला.
हे देखील वाचा- म्हणून मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला ओरडले होते ऋषी कपूर…साधेपणानं राहणं ठरलं होत कारण
या नंतर श्रेयस तळपदे या नावाने घेतलेल्या गरुड झेपेत आज मराठी, हिंदीच नाही तर साऊथ मध्ये गाजलेल्या चित्रपटानं मध्ये देखील हे नाव आदरानं घेतलं जात.