शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हे काय भलतंच, आधी साखरपुडा मोडला आणि…; आता ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाआधी व्हायचं आहे आई, म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2024 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Subha Rajput Broke Engagement

हे काय भलतंच, आधी साखरपुडा मोडला आणि…; आता 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाआधी व्हायचं आहे आई, म्हणाली…

‘शिवशक्ती – तप तांडव त्याग’ ही मालिका हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. ही मालिका टीआरपीच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षक वर्ग भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळतात. मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ‘शिवशक्ती’ या मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री सुभा राजपूत हिचा अभिनेता विभय रायबरोबर साखरपुडा मोडला. (Subha Rajput Broke Engagement)

त्यामुळे सुभा पुन्हा एकदा वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ५ डिसेंबर २०२२ रोजी सुभाने विभवसह साखरपुडा सोहळा उरकला होता. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने नातं तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे. ‘शिवशक्ती – तप तांडव त्याग’मध्ये माता पार्वतीची भूमिका करुन सुभाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अशातच अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नापूर्वी बाळाच्या प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – पारूच्याही मनात अहिल्यादेवींविषयी राग, दिशाची बाजू घेत फटकारलं अन्…; किर्लोस्कर घरातून कायमची बाहेर पडणार का?

View this post on Instagram

A post shared by Subha Rajput (@subharajput)

वयाच्या ३०व्या वर्षी सुभा राजपूत ‘शिव शक्ती – तप तांडव त्याग’ या टीव्ही मालिकेत तीन मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. पिंकविलाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिला खऱ्या आयुष्यात लग्न आणि मुलांबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने अतिशय आश्चर्यकारक उत्तर दिले. यावेळी बोलतानाव सुभा म्हणाली, “मला मूल हवं आहे आणि यासाठी लवकरच मी प्लॅनिंग करेल”.

आणखी वाचा – नम्रता संभेरावचं लेकाबरोबर आहे खास बॉण्डिंग, रुद्राजसाठी अंगाई गाताना दिसली अन्…; व्हिडीओला चाहत्यांची पसंती

ती पुढे असेही म्हणाली की, “मी आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. अशातच आता सर्व गोष्टी विचारपूर्वक हँडल करायला मी सुरुवात केली आहे. आता मी आयुष्यात माझा दृष्टिकोन बदलला आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. काही माझ्यासाठी चांगले सिद्ध झाले यासाठी मी खूप खुश आहे”. वयाच्या ३०व्या वर्षी सुभाने ‘शिवशक्ती तांडव’ या मालिकेत तीन मुलांच्या आईची भूमिका साकारली आता अभिनेत्रीनेखऱ्या आयुष्यात लग्नाआधीच मूल हव असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Tags: entertainmentsubha rajputSubha Rajput Broke Engagementtv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Munjya Movie

ना कोणताही स्टार तरी 'मुंज्या'ला पाहायला तुफान गर्दी, चित्रपटगृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणार, दोन दिवसातच कमावले तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.