अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. आता यात सोशल मीडियाचा देखील समावेश झाला आहे. प्रत्येकजणचं या स्पर्धेत भाग घेताना दिसतोय. सोशल मीडियावर आपण ट्रेंडिंग मध्ये कसे राहू, यासाठी सर्वसामान्य ते सेलेब्रिटी सगळेच प्रयत्न करताना दिसतायत. अशातच सोशल मीडियावर फोटोशूटचं फॅड सगळ्यांनाच लागलं आहे. हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकतंच तीच फोटोशूट इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. (Shivali Parab Bold Photoshoot)

या फोटोशूटसाठी शिवालीने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने स्मोकी आय मेकअप देखील केला आहे. या फोटोशूटसाठी शिवालीने छान नेलआर्ट सुद्धा केलं आहे. शिवलीच्या या फोटोवर एका चाहत्याने “आवली दिसते किती लव्हली” अशी कमेंट केली आहे. तसेच एकाने “खात पित जा खूप बारीक झालीय” अशी विनोदी कमेंट देखील केली आहे.

हे देखील वाचा: पुन्हा एकदा एकत्र आले ‘बबड्या आणि आई’
शिवालीने कॉलेजात असल्यापासूनच नाटकाचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिवालीला पहिल्यापासूनच अभिनय क्षेत्रांमध्ये काही तरी कसून बघायचं होतं. त्यामुळे ती त्या दिशेने नेहमी सक्रिय असायची. शिवाली जसे काम करत केली. तशी तिला प्रसिद्धी मिळत केली. (Shivali Parab Bold Photoshoot)

शिवाली मध्ये इतकी जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे आज ती इतक्या मोठ्या रंगमंचावर तिची कला सादर करताना आपल्याला दिसत आहे. शिवालीने हास्यजत्रा या कार्यक्रमातून साकारलेले प्रत्येक स्किट भाव घाऊनच केले.

हे देखील वाचा: ‘तुम्हाला बाबा म्हणायला लाज वाटते’ भावुक अनिरुद्धची अरुंधती घेणार बाजू..
शिवाली सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. त्यामुळे ती तिचे प्रत्येक व्हिडीओ तसेच फोटोशूट तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवलीच्या फोटोशूटची वाट तिचे चाहते बघत असतात.

शिवाली महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांनंतर पोस्ट ऑफिस उघडं आहे. या मालिकेत दिसली होती. शिवाली कल्याण मध्ये राहत असल्याने तिला कल्याणची चुलबुली शिवाली असे देखील म्हणतात.