प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी कधी कधी कलाकाराला बराच वेळ लागतो पण काही कलाकार या गोष्टीला अपवाद ठरतात. असच काहीस घडलंय अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या कलर्स मराठी वाहिनी वरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिका आणि मालिकेतील कलाकारांसोबत. मालिकेची कथा आणि कलाकार यांच्या कामावर चाहत्यांनी भरभरून प्रेम दर्शवलं आहे. वर्षभरातच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवण्यास मालिकेच्या निर्मात्यांना, कलाकारांना यश आले.(kaveri’s new look)
गावी जाणं आवडत नाही अशी फार कमी लोक असतील आणि त्यातल्या त्यात कोकण म्हणजे प्रत्येक कोंकणवासींचा प्राण. सामान्य माणसू असो किंवा एखादा कलाकार आपल्या गावापासून दूर काम करत असताना गावची ओढ प्रत्येकालाच लागलेली असते. मराठी मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री तन्वी सुद्धा सध्या कोकणात सुट्टीचा आनंद घेताना दिसते.
कलर्स मराठी वाहिनी वरील भाग्य दिले तू मला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी कावेरी म्हणजे अभिनेत्री तन्वी सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. अभिनय, सौंदर्य, अदा या सगळ्या गोष्टीत तन्वी सध्या अग्रेसर आहे त्यामुळेच तिच्या चाहत्या वर्गात सुद्दा कमालीची भर होताना दिसते.(kaveri’s new look)
मालिकेच्या शूट मधून वेळ काढून तन्वीने कोकणात धाव घेतलीये. गावाकडे गेल्यावर एका सुंदर साडीवरचं एक रील तन्वीने शेअर करत ‘ Being कोकणकन्या’ असं कॅप्शन दिल आहे तर तन्वी ने शेअर केलेल्या रील मध्ये तन्वी सुंदर साडी, कपाळावर छान टिकली, साडीवर साजेसे झुमके अशा कमल लुक मध्ये सजलेली दिसते. तन्वीच्या या सुंदर रील वर अनेक कलाकार आणि प्रेक्षकांनी कमेंट करत तिच्या या लुकचं कौतुक केलं आहे.