महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अनेक कलाकार नावारूपाला आले. याच हास्यजत्रेत प्रियदर्शनी नावाच्या मुलीची एन्ट्री झाली. प्रियदर्शनीचा विनोदी अभिनय आणि सोबतच कॉमेडीच अचूक टायमिंग साधत प्रियदर्शीने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. या कार्यक्रमातील डायलॉग सुद्धा खूप फेमस झाले आहेत. याच बरोबर या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांची वेगळीच हवा निर्माण झाली आहे. (shivali avali kohali)
या कार्यक्रमातील “मी शिवाली अवली कोवली” हे स्किट प्रचंड गाजलं. कार्यक्रमातील “मी शिवाली अवली कोवली” या स्किट च रूपांतर गाण्यात झालं. याचबरोबर या स्किटवर अनेकांनी रील सुद्धा बनवल्या. मुंबई आयपीएल टीम मध्ये खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मेरिडिथने “शिवाली अवली कोवली” या गाण्यावर रील बनवली होती. आणि ही रील प्रचंड वायरल झाली. या स्किटमध्ये प्रियदर्शनी देखील होती. नुकतीच प्रियदर्शनीने या सदर्भातली एक स्टोरी पोस्ट केली होती.

हे देखील वाचा: सानिया आणि वैदेहीचंऑफस्क्रीन ट्विनिंग
प्रियदर्शिनीने या स्टोरीमध्ये तिचा, शिवाली परब तसेच नम्रता संभेराव आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन च्या मुलीचा फोटो देखील ऍड केला आहे. आणि यावर “ब्युटीफुल गर्ल्स ऑफ कोहली फॅमिली” असे लिहिले आहे. त्याच झालं असं कि, कोहली गिर्ल्सचा हेअर कट ऐश्वर्याच्या मुलासारखा असल्यामुळे प्रियदर्शनीने स्टोरीवर असे लिहिले आहे. (shivali avali kohali)
हे देखील वाचा: ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील चंदा हे पात्र घेणार प्रेक्षकांचा निरोप
प्रियदर्शनीचा फुलराणी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला. या मध्ये प्रियदर्शनीने एका सध्या घरातील बिन्दास्त मुलगी जिचं पुढे जाऊन कसं नशीब बदलत आणि पुढे आलेल्या चॅलेंजला ती कसं सामोरी जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. प्रियदर्शनीचा फुलराणी हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटात प्रियदर्शनीने मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या सोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटातील प्रियदर्शनीचा “झगा मगा नि मना बघा” हा डायलॉग खूप फेमस झाला.