गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सीताचा शिवाबद्दलचा रोष रामभाऊंच्या जीवावर बेतणार का?, कशी सांभाळणार ही परिस्थिती?, नवं संकट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2024 | 5:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva Serial Update

सीताचा शिवाबद्दलचा रोष रामभाऊंच्या जीवावर बेतणार का?, कशी सांभाळणार ही परिस्थिती?, नवं संकट

छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामधील काही मालिका टीआरपी यादीमध्ये अव्वल स्थान पटकावताना दिसत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शिवा या मालिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, लीडर तसेच जबरदस्त फायटिंग करताना दिसणाऱ्या या शिवाची अनोखी कथा आहे. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या शिवाचा मालिकेतील प्रवास साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. (Shiva Serial Update)

मात्र सध्या मालिकेत शिवा व आशुच लग्न पाहायला मिळालं. आशुबरोबर लग्न झाल्यानंतर शिवाचं आयुष्य पूर्णतः बदललं. हे लग्न शिवा व राम भाऊ सोडून कोणालाच मान्य नसलेलं पाहायला मिळालं. आशुनेही शिवाला बायकोचा दर्जा दिला नाही. त्यामुळे शिवासाठी सासरी वावरणं फार कठीण होऊन बसलं आहे. रामभाऊंची शिवाला मिळालेली साथ या एका गोष्टीवरचं ती या घरात तग धरुन आहे. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये शिवाच्या चुकींचं वाचन तिच्या सासूबाईंनी केलेलं पाहायला मिळालं. हे शिवाबरोबर राम भाऊंनाही ऐकणं कठीण झालं.

आणखी वाचा – “प्रत्येक पुरुषाला दोन बायका हव्या”, अरमान मलिकच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “मग स्त्रियांनाही दोन पुरुष…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये पूजेनंतर शिवाच्या चुका पाहून सीता आक्रोश करते. “पूजेला काय चाललं होत बघितलं नाही का तुम्ही?, पंचामृत सांडलं, अहो साधं हळद-कुंकू लावायची अक्कल नाही तिला, असं शिवाची सासू सीता बोलते. हे ऐकून शिवाच्या डोळ्यात अश्रू येतात. शिवाला अश्रू अनावर होतात. त्यानंतर सगळेचजण चहा पीत असतात, तेव्हा रामभाऊ मस्त चहा झाला आहे असं बोलतात. यावर शिवाची चुलत सासू हा चहा शिवाने बनवला असल्याचं सांगतात. हे ऐकून पुन्हा सीता शिवाला बोलण्याची संधी सोडत नाही.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकरांच्या गाडीमध्ये सापडली मांजरांची पिल्लं, कार सर्व्हिसला दिल्यानंतर लक्ष गेलं अन्…; व्हिडीओ शेअर करत सांगितला प्रकार

सीता पुन्हा म्हणते, “हा चहा आहे. फक्त मारामारी करता येत तिला. बस्स. आता या घरात एकतर मी राहीन नाहीतर ही मुलगी राहील”. सीताचा शिवाबद्दलचा हा आक्रोश पाहून राम भाऊंना वाईट वाटतं. राम भाऊ याचा इतका धसका घेतात की अचानक त्यांच्या छातीत दुखू लागतं. आता सीताचा हा आक्रोश आणि शिवा वरील राग रामभाऊंच्या जीवावर बेतणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi malikamarathi serialshiva serialShiva Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding

Video : लग्न लागताच रडू लागली सोनाक्षी सिन्हा, वडिलांनी मात्र शेजारी उभे असूनही दुसरीकडे तोंड फिरवलं अन्…; व्हिडीओमध्ये दिसलं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.