सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्न लागताच रडू लागली सोनाक्षी सिन्हा, वडिलांनी मात्र शेजारी उभे असूनही दुसरीकडे तोंड फिरवलं अन्…; व्हिडीओमध्ये दिसलं सत्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding

Video : लग्न लागताच रडू लागली सोनाक्षी सिन्हा, वडिलांनी मात्र शेजारी उभे असूनही दुसरीकडे तोंड फिरवलं अन्...; व्हिडीओमध्ये दिसलं सत्य

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. झहीर व सोनाक्षीचे २३ जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले. लग्नानंतर या जोडीचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी व झहीरने नोंदणीकृत पद्धतीने आणि घरच्या घरी लग्न केले. त्यानंतर त्यांनी जवळच्या नातेवाईक व मित्रपरिवारासाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. अशातच आता सोनाक्षीने लग्नाच्या दिवसाचा सुंदर असा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी झहीरचे कुटुंबीय तिच्याबरोबर उभे असल्याचे दिसत आहेत. (Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding)

झहीरचे कुटुंब आणि सोनाक्षीचे कुटुंब या नोंदणीकृत विवाहाचा भाग बनलेले दिसले. याचबरोबर सोनाक्षी व झहीरचे खास व जवळचे मित्रही लग्नाला आले होते. ज्यांनी नवविवाहित जोडप्यासह धमाल, मस्ती करताना दिसली. या व्हिडीओमध्ये तुम्हाला सोनाक्षी-झहीरच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी ‘रामायण’मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी नोंदणीकृत विवाह केला. हा व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षीने लिहिले की, “कुटुंब, मित्र, प्रेम, मैत्री, आनंद, हशा, मूर्ख कमेंट्स, आजूबाजूला धावणारी मुले, डोळ्यातील आनंदाश्रू, उत्साह, भाषण, आरडाओरड, मज्जा, आनंद, भावना व लग्न खऱ्या आनंदात घर, या सगळ्यांनी आम्ही दोघेही परिपूर्ण झालो”.

आणखी वाचा – सीताचा शिवाबद्दलचा रोष रामभाऊंच्या जीवावर बेतणार का?, कशी सांभाळणार ही परिस्थिती?, नवं संकट

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

व्हिडिओ घराच्या एका मजल्यावरून सुरू होतो जिथे सोनाक्षीचे मित्र झहीरला चिडवताना दिसत होते. अभिनेता सिदही इक्बालची छेड काढत आहे. झहीर आणि सोनाक्षी कागदावर सही करतात, तर दोन्ही बाजूचे लोक साक्षीदार म्हणून सही करतात. नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर सोनाक्षी आनंदाने ओरडताना दिसत आहे आणि झहीरला मिठी मारते. लेकीच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा व पूनम सिन्हा भावूक होताना दिसले. यानंतर झहीर व सोनाक्षी कायदेशीररित्या पती पत्नी झाले. लग्नानंतर सोनाक्षीला रडू आले.

आणखी वाचा – जातीमुळे आईने गर्लफ्रेंडशी संबंध तोडण्याचा दिला होता सल्ला, ‘सैराट’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला प्रसंग, म्हणाला, “माझी गर्लफ्रेंड…”

. लग्नाच्या रिसेप्शन लूकसाठी सोनाक्षी व झहीरने लाल व पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन केलं होतं. ग्रँड वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी सिन्हाने लाल रंगाची साडी, केसात गजरा, भांगेत सिंदूर आणि हातात चुडा घातलेला दिसत आहे. तर दुसरीकडे झहीर पांढऱ्या रंगाच्या जोधपुरीमध्ये छान दिसत आहे. सोनाक्षी व झहीर इक्बाल जवळपास सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. जेव्हा सोनाक्षीने लग्नाचा फोटो शेअर केला तेव्हा तिने सांगितले की, २३ जून २०१७ रोजी त्यांनी एकमेकांना कायमचे निवडले.

Tags: bollywood gossipentertainmentsonakshi sinha and zaheer iqbalsonakshi sinha and zaheer iqbal weddingSonakshi Sinha Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Sairat fame actor Tanaji Galgunde shared the story of his elder brother beating wife

"दारू पिऊन भाऊ त्याच्या बायकोला मारायचा अन्...", 'सैराट' फेम अभिनेत्याचा खुलासा, उचललं मोठं पाऊल, म्हणाला, "वहिनीला माहेरी पाठवून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.