गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकेत एन्ट्री होण्यापूर्वी अशी दिसायची ‘शिवा’, केसही होते अगदी सुंदर, फोटो पाहून ओळखणंही झालं कठीण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2024 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Purva Phadke Look

मालिकेत एन्ट्री होण्यापूर्वी अशी दिसायची 'शिवा', केसही होते अगदी सुंदर, फोटो पाहून ओळखणंही झालं कठीण

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत शिवा व आशु यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झालेला पाहायला मिळाला आहे. मालिकेत शिवा व आशु या दोघांचं मनाविरोधात लग्न झालं आहे. ‘शिवा’ हे पात्र मालिकेत बेधडक, स्पष्ट, नेहमीच सगळ्यांच्या मदतीला जाणार आहे. हे पात्र मालिकेत अभिनेत्री पूर्वा फडके साकारत आहे. पूर्वाने याआधी अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Purva Phadke Look)

सोशल मीडियावरही पूर्वा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवा या मालिकेत येण्यापूर्वी पूर्वा खूप वेगळी दिसायची. कलाकार मंडळी त्यांची भूमिका साकारण्यासाठी नेहमीच विशेष मेहनत घेत असतात. बरेचदा भूमिकेसाठी वजन कमी-जास्त करणे हे सुरुच असतं. पण शक्यतो भूमिकेसाठी केस कापले असं फार कमी कलाकारांच्या बाबतीत कानावर येतं. अशीच भूमिकेसाठी शिवा या मालिकेतील पुर्वा हिने विशेष मेहनत घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – अभिषेक बच्चनने बोरिवलीत खरेदी केले एक नव्हे तर तब्बल सहा घरं, किंमत ऐकून व्हाल थक्क

View this post on Instagram

A post shared by Purva kaushik (@kaushikpurva14)

शिवा या भूमिकेसाठी पूर्वाने बॉब कट केला आहे. ‘इट्स मज्जा’ या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच तिने याबाबत भाष्य केलं आहे. पूर्वा या मालिकेत येण्यापूर्वी तिचे केस हे मोठे होते. पूर्वाने या मालिकेतील भूमिकेसाठी बॉब कट केला आहे. यापूर्वी तिचे केस मोठे होते. ती मोठ्या केसांमध्येही खूप सुंदर दिसायची. मात्र पूर्वाला लूक बदलायला फार आवडतं.

आणखी वाचा – श्रद्धा कपूरने राहुल मोदीबरोबरच्या प्रेमाची जाहीरपणे दिली कबुली, एकत्र फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझं हृदय…”

याबाबत बोलताना पुर्वा म्हणाली, “हो. मी या भूमिकेसाठी खरंच केस कापले आहेत. आणि हा लूक मला चांगला वाटतोय. माझ्या दोन्ही सासूबाईंचा बॉब कट आहे. त्यामुळे मी जेव्हा केस कापून त्यांच्यासमोर गेले तेव्हा त्या म्हणाल्या अगं खूप छान दिसतंय. माझा नवरा अमोघ पण बोलला तू अशी राहू शकतेस, ही हेअरस्टाईल तुला छान दिसतेय. त्याने माझ्या सासूला बॉब कटमध्ये पाहिलं आहे त्यामुळे त्याला नवल असं काही वाटलं नाही. सुरुवातीला थोडं बघताना त्यालाही धक्का बसला असेल, मात्र तो मला बोलला की तुला या नव्या हेअरस्टाईलमध्ये बघायची हळूहळू सवय होईल”.

Tags: entertainmentmarathi serialpurva phadkePurva Phadke Lookshiva serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Paaru Serial Promo

पारूनेही केली आदित्यसाठी वडाची पूजा, सावित्रीसमोर आलं मंगळसूत्राचं सत्य, अहिल्यादेवी तिचा सून म्हणून कधी स्वीकार करतील का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.