छोट्या पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर याने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. शाल्वच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शाल्वनेदेखील त्याच्या या पहिल्याच मालिकेत प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये त्याने साकारलेलं ओम हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याचबरोबर स्विटू व ओमची जोडीदेखील चांगलीच गाजली होती. अशातच आता शाल्व आता त्याच्या खऱ्या आयुष्यात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापुरकर ही दोघे गेली अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत. ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शाल्व-श्रेयाची जोडी त्याच्या अनेक चाहत्यांमध्येही लोकप्रिय आहे. गेल्यावर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता. या दोघांच्या साखरपुड्याला कलाविश्वातील त्यांची बरीच मित्रमंडळी उपस्थित राहिली होती. अशातच आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

आणखी वाचा – अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; आरती सिंह व दीपक चौहान यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा
अखेर नुकताच या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे. यासंदर्भात श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली आहे. श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शाल्वबरोबरचे फोटो पोस्ट करत त्यावर मुहूर्त असं लिहिलं आहे. दोघांनी अद्याप लग्नाच्या तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. परंतु, येत्या काही दिवसांत ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात दोघांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शाल्व ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेनंतर फार कुठे दिसला नाही. अशातच त्याने नुकतीच झी मराठी वहिनीद्वारे ‘शिवा’ या मालिकेतून् प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही मालिका सध्या चांगली गाजत असून या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.