झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’, ‘अप्पी आमची कलेक्टर’, सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सारख्या अनेक मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘शिवा’ ही मालिकाही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील शिवा व आशू यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत असून त्यांच्यावर चाहत्यांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. नुकतच मालिकेत दिव्या पळून गेल्याने आता आशुबरोबर शिवाचे लग्न होत असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. यामुळे शिवा व आशू यांच्या मैत्रीत दुरावा आला आहे. शिवाला आशूबरोबर लग्न करायचे होते, मात्र आशूला हे लग्न करायचे नव्हते. पण त्या दोघांचे लग्न झाले आहे.
आशुबरोबर लग्न झाल्यानंतर शिवाचं आयुष्य पूर्णतः बदललं आहे. हे लग्न शिवा व राम भाऊ सोडून कोणालाच मान्य नसलेलं पाहायला मिळालं. आशुही शिवाला बायकोप्रमाणे वागवत नाहीय. पण शिवा मात्र तिच्या संसारासाठी पूर्णत: प्रयत्न करत आहे. शिवा-आशू यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून ती वाटेल ते करत आहे. अशातच आता या मालिकेच्या पडद्यामागील काही खास व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शिवा गॅसचा सिलेंडर उचलताना दिसत आहे. मालिकेतील शिवा म्हणजेच मुख्य अभिनेत्री पूर्वा फडकेने हा पडद्यामागील खास व्हिडीओ शेअर केला आहे.
पूर्वा फडके ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावबर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती मालिकेतील काही खास क्षणदेखील शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती साडी घालून खांद्यावर गॅसचा सिलेंडर उचलत आहे. सुरुवातीला ती एका दमात सिलेंडर उचलते. मात्र सीनमध्ये सिलेंडर उचलताना तिला कष्ट करावे लागत असल्याचे या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडीओबरोबर तिने “पडद्यामागील दृश्य : अनागोंदी आणि सर्जनशीलता यांचे परिपूर्ण मिश्रण.” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – आईच्या आठवणीत आस्ताद काळे भावुक, वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट, म्हणाला, “दु:ख आहे पण…”
दरम्यान, पूर्वाने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. या सीनसाठी पूर्वाने घेतलेल्या मेहनतीबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केलं आहे. “बापरे… पडद्या मागे एवढी मेहनत करावी लागते, खूप मेहनत घेतली आहेस तु पुर्वा या सीनसाठी, गुड जॉब, कमाल” अशा अनेक कमेंट्स करत अनेकांनी पूर्वाचे कौतुक केलं आहे.