रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षया देवधरच्या आईच्या ६०व्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जून 21, 2024 | 4:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tujhyat Jeev Rangla fame Akshaya Deodhar shared a special video of her mother's 60th birthday celebration

अक्षया देवधरच्या आईच्या ६०व्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेत तिने अंजली पाठक ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले.

हार्दिक-अक्षया ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर हे दोघे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अक्षया सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी सक्रिय असते. आपले अनेक  स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच अभिनेत्रीने तिच्या आईच्या साठव्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

या व्हिडीओमध्ये अक्षयाच्या अनेक नातेवाईकांनी सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्रीच्या आईच्या बहिणी म्हणजेच अक्षयाच्या मावशींनी बहिणीच्या साठव्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन केले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. साठव्या वाढदिवसानिमित्त एकूण साठ दिव्यांची आरास करून अक्षयाच्या आईचे खास औक्षण केले असल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – ‘शिवा’ने खऱ्या आयुष्यात लग्नानंतर कधीच वटपौर्णिमा साजरी केली नाही कारण…; स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “एक उपवास केल्यामुळे…”

तसेच अक्षयाच्या आईच्या गळ्यात नोटांची माळही असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अक्षया व तिच्या बहिणीने आईच्या बहिणींच्या मदतीने आपल्या आईचे औक्षण केले आहे. तसेच 60 लिहिलेल्या मोठ्या केकने अक्षयाने तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. अक्षयाच्या आईच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीही उपस्थित होता. अक्षयाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video : बायको वडाची पूजा करण्यासाठी पोहोचताच प्रथमेश परबने शूट केला खास व्हिडीओ, क्षितिजा म्हणाली, “नवरोबा…”

दरम्यान, अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली ‘खूपच छान, किती मस्त” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्सद्वारे अक्षयाच्या आईला त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.      

Tags: akshaya deodharAkshaya Deodhar Mother Birthday Newsmarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
annu kapoor on kangana ranuat and sanjay leela bhansali

“कंगना कोण?, मोठी होरॉईन की…”, अन्नू कपूर यांनी कंगना रणौतला उलट-सुलट सुनावलं, म्हणाले, “फालतू काहीतरी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.